07 August 2020

News Flash

सोळाव्या लोकसभेचे पहिले अधिवेशन ४ जूनपासून

सोळाव्या लोकसभेचे पहिले अधिवेशन येत्या ४ ते ११ जून दरम्यान होणार असल्याचे संसदीय कामकाज मंत्री वेंकय्या नायडू यांनी गुरुवारी सांगितले.

| May 29, 2014 02:47 am

सोळाव्या लोकसभेचे पहिले अधिवेशन येत्या ४ ते ११ जून दरम्यान होणार असल्याचे संसदीय कामकाज मंत्री वेंकय्या नायडू यांनी गुरुवारी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखाली केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक गुरुवारी सकाळी झाली. त्यामध्ये अधिवेशनाचा कालावधी आणि कार्यक्रम ठरविण्यात आला. कॉंग्रेसचे नेते कमलनाथ यांची या अधिवेशनासाठी हंगामी अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे. या अधिवेशनामध्ये निवडून आलेल्या खासदारांना शपथ देण्यात येणार असून, नव्या अध्यक्षांची निवड करण्यात येणार आहे. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी संसदेच्या दोन्ही सभागृहाच्या सदस्यांना ९ जूनला संबोधित करणार असून, त्यानंतर दोन दिवस राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर आभार प्रदर्शन करण्यात येईल. ४ आणि ५ जूनला सदस्यांचा शपथविधी होईल, तर ६ जूनला नव्या अध्यक्षांची निवड करण्यात येईल, असे नायडू यांनी सांगितले. लोकसभेच्या उपाध्यक्षांचा निर्णय नंतर घेतला जाईल, असे ते म्हणाले. केंद्रीय अर्थसंकल्प मांडण्यासाठी जुलैमध्ये पुन्हा अधिवेशन बोलावण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 29, 2014 2:47 am

Web Title: 16th lok sabha first session from 4 june
टॅग Lok Sabha,Parliament
Next Stories
1 निवासस्थानातून भूयारी मार्गाने विमानतळावर जाणारे मोदी ठरणार पहिले पंतप्रधान!
2 ‘फोर्ब्स’च्या सामर्थ्यशाली महिलांच्या यादीत अरुंधती भट्टाचार्य आणि चंदा कोचर
3 मंत्र्यांनो, फेसबुक आणि टि्वटर खाती उघडा – पंतप्रधान
Just Now!
X