27 November 2020

News Flash

बेंजामिन नेत्यानाहू यांच्याविषयीच्या या २० गोष्टी माहित आहेत का?

भारत दौऱ्यावर आले आहेत इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू

बेंजामिन नेतन्याहू म्हणजे जागतिक स्तरावर दबदबा असणारा नेता

इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू सहा दिवसांच्या दौऱ्यासाठी भारतात दाखल झाले आहेत. या दौऱ्यादरम्यान, दोन्ही देशांमध्ये संरक्षण, कृषी, पाणी संरक्षण, विज्ञान आणि तंत्रज्ञान तसेच अंतराळ सुरक्षेसह अनेक आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर यावेळी सविस्तर चर्चा होणार आहे. नेतन्याहू यांच्या सारखा जागतिक स्तरावर दबदबा असणारा नेता भारत भेटीवर येणे मोदी सरकारसाठी महत्वाचे मानले जात आहे. मात्र बेंजामिन नेतन्याहू यांच्याभोवती सतत एक कुतूहलाचे वलय राहिले आहे. म्हणूनच जाणून घेऊयात नेतन्याहू यांच्याबद्दल…

> बेंजामिन नेतन्याहू यांचा जन्म तेल अविवमध्ये २१ ऑक्टोबर १९४९ रोजी झाला. तर त्यांचे बालपण जेरुसलेममध्ये गेले.

> नेतन्याहू यांची तीन लग्ने झाली आहेत. त्यांना तीन मुले आहेत. पहिल्या पत्नीपासून एक मुलगी आणि तिसऱ्या पत्नीपासून दोन मुले. सध्या त्यांचे कुटुंब जेरुसलेममध्ये राहते.

> नेतन्याहू यांचे टोपणनाव बीबी असे आहे. आजही त्यांना या टोपणनावाने ओळखले जाते.

> नेतन्याहू यांना स्पष्ट इंग्रजी बोलणारे आणि समजणारे इस्रायलमधील एकमेव नेते म्हणून ओळखले जातात. त्याचे मुख्य कारण म्हणजे त्यांचे शिक्षण अमेरिकेत झाले आहे. त्यांचे वडील बेन्झीऑन हे ज्या विद्यापिठात संशोधक म्हणून काम करायचे तेथेच नेतन्याहू यांचे शिक्षण झाले.

> मॅसेच्युसेट्स इन्स्टीट्यूट ऑफ टेक्नॉलिजी येथून नेतन्याहू यांनी पदवीचे शिक्षण घेतले असून तेथून त्यांनी उद्योग व्यवस्थापन क्षेत्रात पदव्युत्तर पदवी मिळवली आहे.

> नेतन्याहू १९६७ साली लष्करामध्ये भरती झाले. त्यांनी कॉमांडो युनिटमध्ये काम केले. ते अनेक गुप्त मोहिमेंमध्ये सहभागी झाले.

> १९७२ साली इहूद बराक हे संरक्षणमंत्री असताना साबेना एअरलाइन्सच्या विमानाचे अपहरण झाले. या विमानातील प्रवाशांना सुखरुप सोडवण्यासाठी हाती घेण्यात आलेल्या मोहिमेत नेतन्याहू यांचा सहभाग होता.

> १९७३ साली नेतन्याहू यांनी इस्रायलकडून प्रत्यक्ष युद्धात सहभाग घेतला. या युद्धातील कामगिरीसाठी त्यांना कॅप्टन ही पदवी प्रदान करण्यात आली. मात्र लष्करातील सेवेचा काळ संपल्याने ते लष्करातून बाहेर पडले. (इस्त्रायलमध्ये प्रत्येक इस्त्रायली नागरिकाला ठराविक काळासाठी लष्कारी सेवा सक्तीची असते.)

> युगांडा येथे अपहरण करण्यात आलेल्या इस्त्रायली नागरिकांच्या मुक्ततेसाठी आखण्यात आलेल्या बचाव मोहिमेमध्ये नेतन्याहू यांचा भाऊ योनातान ठार झाला. त्यानंतर नेतन्याहू यांनी सक्रिय राजकारणात प्रवेश केला.

> १९८४ साली त्यांची अमेरिकेतील इस्त्रायलचे राजदूत म्हणून नेमणूक करण्यात आली.

> १९८८ साली नेतन्याहू यांनी उजव्या विचारसरणीसाठी इस्त्रायलमध्ये लोकप्रिय असणाऱ्या लिकूड पक्षाच्या तिकिटावर निवडणूक जिंकून संसदेत प्रवेश मिळवला.

> १९८८ च्या या विजयानंतर नेतन्याहू यांच्या गळ्यात सहाय्यक विदेश मंत्री पदाची माळ पडली

> शांततेसाठी इस्त्रायलने वादग्रस्त भूभागावरील ताबा सोडण्याला नेतन्याहू यांचा कायमच विरोध राहिला. तरी १९९६ ते १९९९ साली पंतप्रधान झाल्यानंतर त्यांनी पॅलेस्टाइनबरोबर झालेल्या शांतता करारानुसार हिबोर्न या शहरातून इस्त्रायली सैन्य मागे घेतले.

> अमेरिकेने हस्तक्षेप केल्यामुळे १९९९ साली मुदतपूर्व निवडणूका झाल्याने नेतन्याहू यांचे पंतप्रधान पद गेले आणि पॅलेस्टाइनबरोबरचा शांतता करार संपला.

> २००३ साली अर्थमंत्री म्हणून काम करताना नेतन्याहू यांनी अनेक मोठे बदल घडून आणले. अर्थव्यवस्थेची वाढ होण्याचे दृष्टीने हे बदल महत्वपूर्ण ठरले.

> २००५ साली इस्त्रायलने गाझा पट्ट्यातून सैन्य मागे घेण्याच्या निर्णयाला विरोध करण्यासाठी त्यांनी मंत्रीपद सोडले.

> २००६ मध्ये नेतन्याहू लिकूड पक्षाचे अध्यक्ष झाले. त्याचबरोबर ते संसदेतीमधील विरोधीपक्ष नेतेही झाले.

> २००९ मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये नेतन्याहू यांच्या नेतृत्वाखाली लिकूड पक्ष मतांच्या आकडेवारीनुसार देशातील दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला. इतर पक्षांबरोबर युती करुन नेतन्याहू यांच्या पक्षाने सरकार बनवले.

> २०१३ साली झालेल्या निवडणुकीनंतर ते तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले. त्यानंतर पुन्हा २०१५च्या निवडणुकीनंतरही तेच पंतप्रधान पदावर कायम राहिले. सलग चार वेळा इस्त्रायलचे पंतप्रधान पद भूषणवणारे ते केवळ दुसरे नेते ठरले. या आधी इस्त्रायलची स्थापना करणारे डेव्हीन बेन गुरियान हे चारवेळा पंतप्रधानपदी विराजमान झाले होते.

> सलग तीनदा निवडून आलेले नेतन्याहू हे इस्त्रायलचे एकमेव पंतप्रधान आहेत.

> सर्वाधिक काळासाठी पंतप्रधानपदी राहणारे ते इस्त्रायलचे दुसऱ्या क्रमांकाचे नेते ठरले आहेत.

(माहिती सौजन्य: रॉयटर्स)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 15, 2018 1:51 pm

Web Title: 20 facts about israels prime minister benjamin netanyahu
Next Stories
1 …तर पाक सैन्याला सुतासारखे सरळ करु: लष्करप्रमुखांची तंबी
2 भारतीय सैन्याच्या कारवाईत पाकचे सात सैनिक ठार
3 कुलभूषण जाधव यांच्या सुटकेसाठी आकाशात झेपावला पतंग!
Just Now!
X