News Flash

जैश-ए-मोहम्मदच्या 21 दहशतवाद्यांची भारतात घुसखोरी, तीन आत्मघातकी हल्ल्यांची योजना

गुप्तचर यंत्रणांनी ही माहिती दिली आहे

जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथे सीआरपीएफ जवानांवर दहशतवादी हल्ला करणाऱ्या जैश-ए-मोहम्मद दहशतवादी संघटनेच्या 21 दहशतवाद्यांनी डिंसेबर महिन्यात जम्मू काश्मीरमध्ये घुसखोरी केली आहे. गुप्तचर यंत्रणांनी ही माहिती दिली आहे. डिसेंबर 2018 मध्ये दहशतवाद्यांनी घुसखोरी केली असून तीन आत्मघातकी हल्ले करण्याची योजना होती. यामधील दोन हल्ले काश्मीरच्या बाहेर करण्यात येणार असल्याचं गुप्तचर यंत्रणांकडून सांगण्यात आलं आहे.

जैश-ए-मोहम्मदच्या म्होरक्या मसूद अझहरचा पुतण्या मोहम्मद उमैर आणि सोमवारी जवानांसोबत झालेल्या चकमकीत ठार झालेल्या कामरानवर हल्ल्यांची जबाबदारी सोपवण्यात आली होती. ऑक्टोबर महिन्यात मसूद अझहरचा पुतण्या उस्मान हैदर मारला गेला होता. त्याच्या हत्येचा आणि अफझल गुरुच्या फाशीचा बदला घेण्यासाठी हा हल्ला करण्याचा कट आखण्यात आला.

५ फेब्रुवारीला पाकिस्तानात मसूद अझहरचा छोटा भाऊ रौफ अझहर याने भारताला आत्मघाती हल्ल्याची धमकी दिल्याचा एक व्हिडीओ समोर आला आहे. यामध्ये त्याने जर मोदी सरकारने अयोध्येत राम मंदिर उभारण्याचा प्रयत्न केला तर आत्मघाती हल्ले करु असं धमकावलं आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दहशतवाद्यांना दोन गटांमध्ये विभागण्यात येणार असून एका गटाचं नेृतृत्व मुदस्सिर खान आणि दुसऱ्याचं शाहीद बाबा याच्याकडे सोपवण्यात येणार होतं. पण बाबा याला 1 फेब्रुवारीला पुलवामा येथे झालेल्या चकमकीत सुरक्षा जवानांनी ठार केलं.

तीन आत्मघाती हल्लेखोरांपैकी आदिल अहमद दार याची 14 फेब्रुवारीच्या हल्ल्यासाठी निवड करण्यात आली होती. तर इतर दोघांवर जम्मू आणि अजून एका अन्य ठिकाणी करण्यात येणाऱ्या हल्ल्याची जबाबदारी सोपवण्यात आल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. दहशतवाद्यांकडे १६ वाहनं असून १९९० ते १९९५ दरम्यान रजिस्टर्ड नंबर आहेत. आपली ओळख पटू नये यासाठी दहशतवादी जुन्या वाहनांचा वापर करत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 19, 2019 8:40 am

Web Title: 21 terrorist of jaish e mohammad entered in kashmir
Next Stories
1 जय शिवराय! जगभरातील संशोधक आणि तज्ज्ञ शिवरायांच्या कार्याने प्रभावित, म्हणतात…
2 मॉर्निंग बुलेटिन : पाच महत्त्वाच्या बातम्या
3 माझ्याकडून कोणत्याही चमत्काराची अपेक्षा ठेवू नका – प्रियंका गांधी
Just Now!
X