News Flash

Aadhaar PAN Linking: ‘सरकारने आधी आयकर विभागाची वेबसाईट नीट चालवावी’; साईट क्रॅश झाल्याने सर्वसामान्य संतापले

‘पॅन कार्ड’ आणि ‘आधार कार्ड’ लिंक करण्यासाठी आजचा शेवटचा दिवस

प्रातिनिधिक फोटो (मूळ फोटो रॉयटर्सवरुन साभार)

‘पॅन कार्ड’ आणि ‘आधार कार्ड’ लिंक करण्यासाठी आजचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळेच अद्याप पॅन आणि आधार लिंक न केलेल्यांच्या आयकर विभागाच्या साईटवर उड्या पडल्याचे चित्र पहायला मिळत आहे.  ३१ मार्च २०२१ आधी ही प्रक्रिया पूर्ण केली नाहीत तर पॅन कार्ड वापरासंदर्भातील काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो. सरकारने यासाठी ३१ मार्च २०२१ ही अंतिम मुदत दिली आहे. मात्र अनेकांनी एकाच वेळी यासाठी आयकर विभागाच्या वेबसाईटला भेट दिल्याने साईट क्रॅश झाली आहे. अनेकांनी यासंदर्भात ट्विटरवर तक्रार केलीय.

जाणून घ्या >> Aadhaar आणि PAN लिंक करण्यासाठी आजचा शेवटचा दिवस; न केल्यास पगारही रोखला जाऊ शकतो

पॅन आणि आधार लिंक करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना सर्व्हरमध्ये अडचण असल्याचं, साईट सुरु होऊ शकत नाही असे संदेश स्क्रीनवर दिसत आहेत. अनेकांनी यासंदर्भातील स्क्रीनशॉर्ट शेअर करत आता साईटच बंद असल्यावर आम्ही हे काम आजच्या आज कसं करायचं असा प्रश्न सरकारी यंत्रणांना विचारला आहे. आयकर विभागाच्या ट्विटर हॅण्डलसोबतच अनेकांनी युआयडी म्हणजेच आधारच्या ट्विटर हॅण्डलला टॅग करुनही हे प्रश्न विचारलेत.

अनेकांनी तर दोन्ही माहिती जर सरकारकडे आहे तर त्यांनी त्या लिंक करुन घ्याव्यात, सर्वसामान्यांना का वेठीस धरलं जात आहे असा प्रश्न विचारला आहे. तर काहींनी आयकर विभागाची साईट कधीच सुरु नसते अशी तक्रार ट्विटरवरुन केलीय. या तक्रारींमुळेच PANcard आणि Aadhaar हे दोन विषय टॉप ट्रेण्डमध्ये आलेत.

१) काय सर्व्हर आहेत


२) साईटच काम करत नाही


३) अनेकदा प्रयत्न केले


४) दंड वसुल करुन गल्ला भरण्याचा प्रयत्न


५)कसं करायचं तुम्हीच सांगा


६)इतर काही पर्याय आहे का?


७)सगळी धावपळ


८) कामच करत नाहीय साईट


९) कायमच साईट बंद असते


१०) पर्यायच दिसत नाही


११) तुम्हीच घ्या जोडून


१२) कसं करु विचारणारे अनेक आहेत


१३) माकडं झालं अनेकांचं


१४) आधी साईट नीट कार्यरत आहे का ते पाहा

१५) लोकांनी का करावं?

दरम्यान हा गोंधळ पाहता अनेकांनी आज असणारी शेवटची तारीख पुन्हा वाढवून दिली जाण्याची शक्यताही व्यक्त केली आहे. मात्र ही बातमी देईपर्यंत डेडलाइन वाढवण्यासंदर्भात कोणताही निर्णय जाहीर करण्यात आला नव्हता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 31, 2021 1:34 pm

Web Title: 31 march 2021 is the deadline for linking of pan card with aadhaar and income tax website is down scsg 91
Next Stories
1 आणखी ३ राफेल लढाऊ विमाने आज भारतात होणार दाखल
2 ‘करोना उद्रेक झालेल्या जिल्ह्यांत दोन आठवड्यात लसीकरण पूर्ण करा’
3 येत्या निवडणुकीत नवीन ईव्हीएम वापरले जातील, आयोगाने मद्रास हायकोर्टाला दिली माहिती
Just Now!
X