रेल्वेमधील महिला प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. जयपूर-वांद्रे एक्स्प्रेसमध्ये एका ३२ वर्षीय महिलेवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. स्लीपर बर्थ देतो, असे सांगून एका व्यक्तीने बलात्कार केल्याचा आरोप महिलेने केला आहे.
Surat (Gujarat): A 32-year-old woman allegedly raped in Jaipur-Bandra Express's pantry car on pretext of a seat in a sleeping car (June 9) pic.twitter.com/y5P3PveUWo
— ANI (@ANI) June 13, 2017
पीडित महिलेच्या तक्रारीनुसार, ९ जून रोजी जयपूर-वांद्रे एक्स्प्रेसमधून प्रवास करत असताना एका व्यक्तीने स्लीपर बर्थ देतो, असे सांगितले. त्यानंतर पँट्री कारमध्ये नेऊन तिथे बलात्कार केला, असा आरोप पीडित महिलेनं केला आहे. जयपूर रेल्वे पोलिसांनी १२ जून रोजी आरोपीला अटक केली असून, त्याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर हे प्रकरण सूरत रेल्वे पोलिसांकडे वर्ग करण्यात आले आहे. या घटनेतील आरोपीवर कारवाई करण्यात आल्याची माहिती रेल्वेने ट्विटरवरून दिली. त्यानंतर ट्विटर यूजर्सने रेल्वे प्रशासनावर टीकेची झोड उठवली.