छत्तीसगडच्या नारायणपूर येथील गुमटेर भागात नक्षलवाद्यांबरोबर झालेल्या चकमकीत सीआरपीएफचे ४ जवान शहीद झाले आहेत. तर इतर ७ जवान जखमी झाले असून यातील ४ जणांची प्रकृती गंभीर आहे, एएनआयने यासंदर्भात ट्विट केले आहे.


एएनआयच्या माहितीनुसार, चकमकीत जखमी झालेल्या जवानांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या जखमी जवानांपैकी ४ जवानांची प्रकृती गंभीर आहे. नक्षलवाद्यांसोबत सुरु असलेली ही चकमक सकाळपासूनच सुरु होती. नक्षलवाद्यांनी वेळ साधताच सुरक्षा रक्षकांना घेरले आणि तुफान गोळीबार सुरु केला. त्यामुळे एकत्रित सापडलेल्या जवानांच्या मृत्यूचा आकडा वाढला आहे.

यापूर्वी चार दिवसांपूर्वी छत्तीगडच्या राजनांदगांव जिल्ह्यात झाडीखैरा जंगलात दोन डब्यामध्ये ठेवलेले बॉम्ब जप्त करण्यात आले होते. हे बॉम्ब पोलीस आणि आयटीबीपीद्वारे चालवल्या जाणाऱ्या शोध मोहिमेंतर्गत जप्त करण्यात आले होते. बॉम्ब जप्त केल्यानंतर ते संयुक्त पथकाद्वारे नष्ट करण्यात आले होते.