देहरी-ऑन-सोने (बिहार) : राज्याच्या रोहटस जिल्ह्य़ात पोलिसांनी सोमवारी एका खासगी वाहनातून तपासणीदरम्यान बेकायदेशीररीत्या विक्रीसाठी नेला जाणारा सुमारे ८० किलो गांजा पकडला. सुमारे आठ लाख रुपये किमतीचा हा गांजा राष्ट्रीय महामार्ग २ वर पकडण्यात आला. राष्ट्रीय महामार्गावर भेडिया गावाजवळ पोलिसांकडून वाहनांची नेहमीप्रमाणे तपासणी सुरू असताना खेळण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या एका चारचाकी गाडीत हा गांजा सापडल्याचे पोलीस महानिरीक्षक मनी महाजन यांनी सांगितले. याप्रकरणी दोन जणांना ताब्यात घेण्यात आले असून ते उत्तर प्रदेशातील अलाहाबाद येथील रहिवासी आहेत. ओदिशातून जकात चुकवून अलाहाबाद येथे विक्रीसाठी हा गांजा नेण्यात येत होता, असे पोलिसांनी चौकशीनंतर सांगितले.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on December 25, 2012 4:17 am