चाइल्ड पॉर्नोग्राफीच्या आरोपाखाली फ्लोरिडामधील एका व्यक्तीला ३३० वर्ष कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. आरोपी सेक्स ट्रिपसाठी फिलिपिन्सला जात होता अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. फिलिपिन्सच्या दौ-यावर गेल्यानंतर आरोपी लहान मुलांसोबत लैंगिक अत्याचार करत त्याचे व्हिडीओ रेकॉर्ड करुन सोशल मीडियावर शेअर करत असे अशी माहितीही पोलिसांनी दिली आहे.
आरोपी डेव्हिड लिंच हा सहा वर्षापर्यंतच्या लहान मुलांना आपला शिकार बनवत असे. २००५ पासूनच तो ऑनलाइन डेटिंग अॅप्सवर व्हिडीओ अपलोड करत होता. २०१६ मध्ये फिलिपिन्सला जाणाऱ्या विमानाने प्रवास करतेवेळी त्याला अटक करण्यात आली होती.
सरकारी वकिलांनी न्यायालयात दिलेल्या माहितीनुसार, आरोपी डेव्हिडच्या सेक्स ट्रिपपैकी एका ट्रिपचा खर्च पीडित मुलाच्या आईने केला होता. आरोपी डेव्हिड लिंचला दोन मुलं असून तेदेखील फिलिपिन्समध्ये राहतात. लिंचला गतवर्षी दोषी ठरवण्यात आलं होतं. गेल्याच आठवड्यात त्याला शिक्षा सुनावण्यात आली. न्यायालयाने लिंच याचं घरदेखील जप्त करण्याचा आदेश दिला आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on April 23, 2018 4:26 pm