आम आदमी पार्टीने दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी आपल्या आगामी जाहीरनाम्यात किफायतशीर दरात घरे आणि शिक्षणाच्या सुविधा पुरवण्यावर भर दिला आहे.  दिल्लीत अर्बन शेल्टर इंप्रूव्हमेंट बोर्डाकडे साधारण २०० एकर जागा विनावापर पडून आहे. त्यावर सामान्यांसाठी परवडणाऱ्या किमतीतली घरे उभारता येतील, असे पक्षाने म्हटले आहे. शैक्षणिक कर्ज घेणाऱ्या विद्यार्थ्यांना घर किंवा अन्य मालमत्ता तारण ठेवावी लागू नये म्हणून सरकारच बँकेकडे हमीदार राहील, असेही पक्षाने म्हटले आहे.