01 December 2020

News Flash

हल्ल्याअगोदर अफझल दहशतवाद्यांच्या संपर्कात होता

संसदेवर हल्ला करण्याच्या काही मिनिटेअगोदरच अफझलने आत्मघातकी दहशतवाद्याशी संपर्क साधला होता, हा त्याचा हल्ल्यात सक्रिय सहभाग असल्याचा ठोस परिस्थितीजन्य पुरावा असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.

| February 10, 2013 02:54 am

संसदेवर हल्ला करण्याच्या काही मिनिटेअगोदरच अफझलने आत्मघातकी दहशतवाद्याशी संपर्क साधला होता, हा त्याचा हल्ल्यात सक्रिय सहभाग असल्याचा ठोस परिस्थितीजन्य पुरावा असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.
संसदेवर हल्ला होण्यापूर्वी गुरू याच्या भ्रमणध्वनीवर मोहम्मद नावाच्या दहशतवाद्याकडून १०.४३, ११ आणि ११.२५ वाजता संपर्क साधण्यात आला होता. या भ्रमणध्वनीवर करण्यात आलेल्या संभाषणाची शब्दांकित प्रत उपलब्ध करण्यात आली होती. जी योजना आखण्यात आली आहे ती प्रत्यक्ष कृतीत आणण्याची प्रक्रिया आम्ही सुरू करीत आहोत, असे मोहम्मद याने गुरूला सांगितल्याचे या शब्दांकित मसुद्यावरून स्पष्ट होते, असे सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निकालात म्हटले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 10, 2013 2:54 am

Web Title: afzal was in contact with terrorist before atack
टॅग Attack,Terrorist
Next Stories
1 अजमेर दर्गाप्रमुखांकडून निर्णयाचे स्वागत
2 जम्मू-काश्‍मीरमध्ये संचारबंदी कायम
3 ‘मला माझ्या वडिलांचा चेहरा बघायचाय, त्यांचा मृतदेह आमच्याकडे द्या’
Just Now!
X