केंद्रीय गृहनिर्माण व शहरी दारिद्र्य निर्मूलनमंत्री अजय माकन यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. केंद्रीय मंत्रिमंडळ; तसेच काँग्रेस महासमितीत पुढील आठवड्यात फेरबदल होण्याची चिन्हे आहेत. माकन यांच्या राजीनाम्याने फेरबदलांच्या वृत्ताला दुजोरा मिळाला आहे. राहुल गांधी यांच्या “यंग ब्रिगेड’मधील सदस्य असलेले ४९ वर्षीय माकन यांना वर्षाअखेरीस दिल्लीत होणाऱ्या विधानसभा निवडणुकांसाठी पदमुक्त करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. शीला दीक्षित यांना केंद्रात मंत्रिपद दिले जाण्याची चर्चाही राजकीय वर्तुळात होत आहे. अशा परिस्थितीत माकन यांच्याकडे मुख्यमंत्रिपद येऊ शकते.