उत्तर प्रदेश पोलीस खात्यातील आठ पोलिसांच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेला कुख्यात गुंड विकास दुबेला १० जुलै रोजी एन्काउंटरमध्ये ठार करण्यात आलं. या एन्काउंटरवरुन आता उत्तर प्रदेशमध्ये राजकीय वाद सुरु झाले आहेत. हा एन्काउंटर झाला त्या दिवशीच सत्ताधारी भाजपाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी आरोप केले होते. ट्विटवरुन “खरंतर ही गाडी उलटली नाही. काही माहिती उघड झाल्यास सरकार पडण्यापासून वाचवण्यात आलं आहे,” असा गंभीर आरोप अखिलेश यादव यांनी केला होता. मात्र आता ट्विटवर अखिलेश यादवच या प्रकरणावरुन केलेल्या एका वक्तव्यामुळे ट्रोल होताना दिसत आहेत. यादव यांनी गुगल मॅप्सच्या मदतीने अपघात कसा झाला हे शोधता येईल असं वक्तव्य एका मुलाखतीदरम्यान केल्याने अनेकांनी त्यांना ट्रोल केलं आहे.
काय म्हणाले यादव?
विकास दुबेचा एन्काउंटर झाला त्या दिवसापासून सरकारच्या भूमिकेबद्दल शंका उपस्थित करणाऱ्या यादव यांनी नुकतीच एका वेबसाईटला व्हिडिओ कॉलद्वारे मुलाखत दिली. यावेळी त्यांनी या एन्काउंटरचा तपास झाला पाहिजे असं सांगताना गुगल मॅप्सचा तपासासाठी वापर करावा असं म्हटलं.
नक्की वाचा >> “चालक थकलेला होता आणि तितक्यात गाडीसमोर…”; दुबे प्रकरणातील कार अपघातासंदर्भात पोलिसांचे स्पष्टीकरण
“गुगल मॅपच्या मदतीने आपण बॅरिकेट्स कधी लावण्यात आले?, गाडी कशी पलटली याचा तपास करु शकतो. आज हे तंत्रज्ञान उपलब्ध आहे. आपण आणखीन काही काळ उशीर केला तर त्या दिवसाच्या गुगल मॅप ट्रॅफिकचा डेटा आपल्याला मिळणार नाही. आपण गुगल मॅपच्या मदतीने गाडी कशी पलटली, किती वाजता पलटली यासंदर्भातील माहिती टाइमलाइनच्या मदतीने मिळवू शकतो. सरकारला ही माहिती मिळू शकते,” असं यादव या मुलाखतीमध्ये म्हणाले आहेत. यावरुनच आता ते ट्रोल होत आहेत. संबित पात्रा यांनाही ट्विटरवरुन ‘गुगल मॅप्स’ एवढे दोनच शब्द ट्विट केले आहेत.
GOOGLE MAP
— Sambit Patra (@sambitswaraj) July 14, 2020
Funniest thing you’ll see today pic.twitter.com/1JnqsA8tCB
— Hemant Jain (@HemantJain_) July 14, 2020
अनेकांनी यादव यांनी ट्रोल केल्याने Google Maps आणि Akhilesh Yadav हे दोन शब्द ट्विटरवर ट्रेण्ड होताना दिसत होते. दरम्यान दुबे एन्काउन्टर प्रकरणात गाडीसमोर गुरं आल्याने त्यांना वाचवण्याच्या प्रयत्नात अपघात झाल्याचे पोलिसांनी म्हटलं आहे.