News Flash

यासिन बटला अटक करण्यात गुजरात एटीएसला यश

अक्षरधाम मंदिरावरील हल्ल्यातील प्रमुख सूत्रधार

गुजरातमधील अक्षरधाम मंदिरावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील प्रमुख सूत्रधार व लश्कर-ए-तोयबाचा दहशतवादी यासिन बट याला काश्मीरमधील अनंतनागमध्ये आज अटक करण्यात यश आले. गुजरातच्या दहशतवाद विरोधी पथकाने त्याला अटक केली. २००२ मध्ये अक्षरधाम मंदिरावर झालेल्या हल्ल्यात ३० जणांचा मृत्यू तर ८० पेक्षा अधिकजण जखमी झाले होते.

जम्मू-काश्मीर पोलिसांच्या मदतीने यासीनला दक्षिण काश्मीरमधील अनंतनाग येथे पकडण्यात आले. येथून गुजरात एटीएसचे विशेष पथक त्याला अहमदाबादला घेऊन आले.

गुजरातमधील गांधीनगर येथील प्रसिद्ध अक्षरधाम मंदिरात २४ सप्टेंबर २००२ रोजी दोन दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. एनएसजीच्या कमांडोंच्या सहाय्याने जवळपास १२ तास या ठिकाणी ऑपरेशन चालल्यानंतर दोन्ही दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला होता. हा हल्ला घडवून आणणाऱ्या दहशतवाद्यांना यासीन बटने मदत केली होती. याशिवाय मोहमद फारूख शेख याने देखील या हल्ल्यासाठी आर्थिक मदत केली होती. ज्याला मागिल वर्षी सौदी अरबमधून परतताना अटक करण्यात आली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 26, 2019 8:55 pm

Web Title: akshardham temple attack accused yasin arrested by gujarat ats msr 87
Next Stories
1 ‘निवडणुकांसाठी केंद्र सरकारने आर्थिक मदत करावी’
2 ५० दिवसांत घेतलेले निर्णय हे ५० वर्षातील निर्णयांपेक्षा अधिक चांगले – नड्डा
3 कर्नाटकात भाजपाचीच सत्ता! मुख्यमंत्री झाले येडियुरप्पा
Just Now!
X