21 October 2020

News Flash

अक्षय कुमारला स्वाभिमान नाही म्हणणाऱ्या नेटकऱ्याला अनुराग कश्यपचा पाठिंबा

पोलीस विद्यार्थ्यांना मारहाण करत असलेल्या व्हिडीओला अक्षयने लाईक केलं होतं

सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात दिल्लीमधील जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठात पोलीस आणि विद्यार्थ्यांमध्ये उडालेल्या धुमश्चक्रीनंतर रविवारी हिंसाचार उफाळून आला होता. या आंदोलनादरम्यान दिल्ली पोलिसांनी जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठात शिरून विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज केला. या घटनेचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. यातील एका व्हिडिओला अभिनेता अक्षय कुमारने लाईक केले होते. त्यावरुन अनेकांनी अक्षय कुमारवर टीकेची झोड उठविली. यात चित्रपट दिग्दर्शक अनुराग कश्यपनेदेखील अक्षयचा समाचार घेतला आहे.

नागरिकत्व दुरूस्ती विधेयकाविरोधात रविवारी दिल्लीतील जामिया विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी रविवारी आंदोलन केलं. यावेळी विद्यार्थी आणि पोलिसांत शाब्दिक चकमक झाली. त्यानंतर आंदोलनाला हिंसक वळण लागले होते. त्यानंतर रात्री पोलिसांनी विद्यापीठात घुसून विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज केला. शिवाय पोलिसांनी काही निदर्शकांना देखील ताब्यात घेतले होते. या सर्व घटनांचे व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाले. त्यापैकी एका व्हिडिओमध्ये पोलीस विद्यार्थ्यांना मारहाण करताना दिसत आहे. हाच व्हिडिओ अक्षय कुमारने लाईक केला होता. ही बाब नेटकऱ्यांच्या लक्षात आली आणि त्याचा स्क्रीनशॉर्ट व्हायरल होऊ लागला. त्यानंतर सोशल मीडियावर अक्षयला मोठ्या प्रमाणावर ट्रोल करण्यात आलं.


यामध्ये एका नेटकऱ्याने “मला अक्षय कुमारविषयी प्रचंड आदर आहे. कणा नसताना मार्शियल आर्टसची ट्रेनिंग घेणं खूप कठीण असत,” अस म्हटलं होतं. अप्रत्यक्षरित्या अक्षयच्या ‘स्वाभिमानाचा कणा मोडला आहे’, असं म्हणतं त्याच्यावर टीका केली होती. तसंच त्याने हे ट्विट अनुराग कश्यपला टॅग केलं. “यावर तुम्हाला काय वाटतं?” असा प्रश्न त्याने अनुरागला विचारला. नेटकऱ्याने प्रश्न विचारल्यानंतर अनुराग कश्यपने रिट्विट करत तुझ्या मताशी सहमत असल्याचं म्हटलं.

दरम्यान, अक्षयने व्हिडीओ लाईक केल्यानंतर त्याने जाहीरपणे माफी मागत चुकून हा व्हिडीओ लाईक केल्याचं सांगितलं. मात्र त्याच्यावरील सूर काही झालेला नाही

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 17, 2019 3:29 pm

Web Title: akshay kumar called spineless on twitter anurag kashyap concurs ssj 93
Next Stories
1 विद्यार्थ्यांना करायला लावलं ‘बाबरी’ विध्वंसाचं प्रात्यक्षिक, RSS नेत्याविरोधात गुन्हा दाखल
2 जामिया हिंसाचार : याचिकांमध्ये हस्तक्षेपास सुप्रीम कोर्टाचा नकार, हायकोर्टात जाण्याचा सल्ला
3 योगी सरकार आता मेरठचे नाव पंडित नथुराम गोडसे नगर करणार?
Just Now!
X