News Flash

भारतीयास मारहाणप्रकरणी पोलिसास अटक

भारतीय वृद्धास मारहाण करून त्याला जायबंदी केल्याच्या प्रकरणी अमेरिकी पोलीस अधिकाऱ्यास अटक करण्यात आली असून, एफबीआयने या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत.

| February 14, 2015 02:01 am

भारतीय वृद्धास मारहाण करून त्याला जायबंदी केल्याच्या प्रकरणी अमेरिकी पोलीस अधिकाऱ्यास अटक करण्यात आली असून, एफबीआयने या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत. सुरेशभाई पटेल यांना संशयित समजून या पोलीस अधिकाऱ्याने मारहाण केली होती. दरम्यान, पटेल यांच्या कुटुंबाने नुकसानभरपाईसाठी दावा दाखल केला आहे.मॅडिसन शहर पोलीसप्रमुख लॅरी म्युनसे यांनी सुरेशभाई पटेल यांची माफी मागितली आहे. दोन पोलीस अधिकाऱ्यांनी सुरेशभाई पटेल यांना जबर मारहाण केली होती. त्यांना इंग्रजी येत नसल्याने या पोलिसांनी विचारलेल्या प्रश्नांना ते उत्तरे देऊ शकले नाहीत. दरम्यान, फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन (एफबीआय) या प्रकरणी चौकशी करीत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 14, 2015 2:01 am

Web Title: alabama police officer arrested accused of injuring indian man
Next Stories
1 शपथविधीपूर्वी नोकरशहा कामाला!
2 सत्तेनंतर अहंकार जागृत होतो- अरविंद केजरीवाल
3 केजरीवालांना ‘चोर’ का म्हणाला? – केंद्रीय मंत्र्यांना सरसंघचालकांचा प्रश्न
Just Now!
X