लुइस बर्जर लाचप्रकरणी गोव्याचे माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री चर्चिल आलेमाव यांना पोलिसांनी अटक केली असून, गोव्याचे माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्यावर कारवाई करण्यासाठी पावले उचलली आहेत. त्याचप्रमाणे कामत यांच्या अटकपूर्व जामिनाला विरोध करण्याची तयारी पोलिसांनी सुरू केली आहे.
गोव्याच्या दक्षिण भागांतील आगाशी गावातून आलेमाव (६६) यांना ताब्यात घेण्यात आले आणि मध्यरात्री त्यांना अटक करण्यात आली. या लाचप्रकरणी आपण निर्दोष असल्याचा दावा आलेमाव यांनी केला असून राजकीय हेतूने आपल्याला अटक करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे. मात्र मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी हा आरोप फेटाळला आहे.