अलिगढ मुस्लीम विद्यापीठात २०१०-११ मध्ये विद्यार्थी संघाची निवडणूक लढवणारी पहिली महिला ठरलेली अस्मा जावेद हिची हत्या करण्यात आली आहे. मोबाइल बंद असल्याने भावाने बेपत्ता असल्याची तक्रार दिली होती. गेल्या गुरुवारी ती आईशी बोलली, त्यानंतर संपर्क नव्हता. तिच्या फ्लॅटला बाहेरून कुलूप असल्याचे आढळले होते.
बुधवारी पोलिसांनी दरवाजा उघडला तेव्हा तिची हत्या झाल्याचे पोलीस निरीक्षक सूर्यकांत द्विवेदी यांनी स्पष्ट केले. तिच्या मानेवर व डोक्यात जखमा होत्या.
 या संदर्भात दोन व्यक्तींची चौकशी केली जात असल्याचे अलिगढचे पोलीस अधीक्षकांचे जनसंपर्क अधिकारी जे. रवींद्र गौड यांनी स्पष्ट केले.