12 August 2020

News Flash

चीनला चिथावणी! अमेरिकेच्या F-18 फायटर विमानांचे दक्षिण चीन सागरावरुन उड्डाण

दक्षिण चीन सागरातील चीनच्या वाढत्या दादागिरीला अमेरिकेने अत्यंत गांभीर्याने घेतले आहे. समुद्रातील वादग्रस्त प्रदेशात अमेरिकेने नौदलाच्या युद्धनौकांच्या फेऱ्या वाढल्या आहेत.

दक्षिण चीन सागरातील चीनच्या वाढत्या दादागिरीला अमेरिकेने अत्यंत गांभीर्याने घेतले आहे. समुद्रातील वादग्रस्त प्रदेशात अमेरिकेने नौदलाच्या युद्धनौकांच्या फेऱ्या वाढलेल्या असताना मंगळवारी अमेरिकन नौदलाच्या २० F-18 फायटर जेट विमानांनी दक्षिण चीन सागरातील वादग्रस्त प्रदेशात गस्त घातली. अमेरिकेचे हे शक्तिप्रदर्शन एकप्रकारे चीनसाठी खुले आव्हान आहे.

F-18 विमानांनी आकाशात आपले कौशल्य दाखवल्यानंतर या विमानांनी अमेरिकन विमानवाहू युद्धनौका यूएसएस थियोडोर रूजवेल्टवर लँडींग केले. यूएसएस थियोडोर रूजवेल्ट फिलीपाईन्सच्या दिशेने चालले आहे. दक्षिण चीन सागरात गस्त घालणारा अमेरिका एकमेव देश नसून चीन, जपान आणि अन्य देशही गस्त घालत असतात. फायटर जेट विमानांचे हे उड्डाण नियमित सरावाचा भाग होता असे अमेरिकेने म्हटले आहे.

काही दिवसांपूर्वी चीननेही दक्षिण चीन सागरात आपल्या नौदल आणि हवाई शक्तिचे प्रदर्शन केले होते. चीन संपूर्ण दक्षिण चीन सागरावर आपला हक्क सांगत असून त्यावरुन त्यांचे शेजारी देशांबरोबर वाद आहेत. चीनला या समुद्रातील नैसर्गिक साधन संपत्तीचे स्त्रोत हवे असून त्यासाठी चीन कुठल्याही थराला जाऊ शकतो. चीनने इथे कृत्रिम बेटांची उभारणी सुरु केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 11, 2018 6:42 pm

Web Title: america fighter jet fly in south china sea
Next Stories
1 झुकेरबर्गनंतर आता राहुल गांधींनीही देशाची माफी मागावी : रविशंकर प्रसाद
2 शिर्डीवर ट्विट केल्यामुळे राहुल गांधी अडचणीत
3 पेट्रोल, डिझेलचे दर वाढवू नका, सरकारचे पेट्रोल कंपन्यांना निर्देश?
Just Now!
X