‘काँग्रेसमुक्त भारत’ या घोषणेचा चुकीचा अर्थ लावला जात असल्याचे स्पष्टीकरण गुरूवारी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्याकडून देण्यात आले. ते गुरूवारी मोदी सरकारच्या द्विवर्षपूर्तीनिमित्त दिल्लीत प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना बोलत होते. यावेळी अमित शहा यांनी म्हटले की, काँग्रेसमुक्त भारत ही घोषणा काँग्रेसच्या अनेक दशकांच्या सत्ताकाळात तयार झालेल्या अव्यवस्थेविरुद्धची प्रतिक्रिया आहे. पक्षाच्या स्वार्थासाठी काँग्रेसच्या नेत्यांनी देशाच्या भल्याकडे दुर्लक्ष केले. आम्हाला काँग्रेसच्या राजवटीखाली वाढलेल्या या व्यवस्थेचा अंत करायचा असल्याचे अमित शहा यांनी सांगितले. यावेळी पत्रकारांनी शहा यांना खासदार सुब्रमण्यम स्वामी यांची भूमिका पक्षाचे अधिकृत समजायची का, असा सवाल विचारला. यावर मी सांगेन तीच पक्षाची अधिकृत भूमिका असेल, असे शहा यांनी म्हटले.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on May 26, 2016 2:55 pm