अमृतसरमधील जोडा रेल्वेफाटक अपघाता प्रकरणी पंजाब पोलिसांनी ट्रेनच्या मोटरमनला ताब्यात घेतले असून त्याची चौकशी सुरु आहे. शुक्रवारी रात्री जालंधरहून अमृतसरच्या दिशेने भरधाव वेगात जाणाऱ्या ट्रेनने जोडा फाटक येथे रुळावर रावण दहन पाहत उभ्या असलेल्या अनेकांना उडवलं. या अपघातात ६० पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मला ट्रेन पुढे नेण्यासाठी हिरवा कंदिल दाखवण्यात आला होता. सर्व मार्ग मोकळा आहे असे मला वाटले. रेल्वे रुळावर इतके लोक थांबले आहेत याची मला अजिबात कल्पना नव्हती असे या मोटरमनने सांगितले. रावण दहन कार्यक्रमाच्या आयोजकांविरोधात अजून कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. आयोजक हे पंजाबमधील सत्ताधारी काँग्रेस पक्षाचे नेते आहेत. दरम्यान आयोजक भूमिगत झाल्याची माहिती आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Amritsar train accident motorman of train detanined
First published on: 20-10-2018 at 10:36 IST