भारत ही जगाची नपुंसकत्वाची राजधानी आहे असे एका अभ्यासातून उघड झाले आहे. लोकसंख्या आणि जीवनशैलीशी निगडित आजारांचा प्रादुर्भाव यामागील संभाव्य कारणं असल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. अपजॉनच्या पाहणीत हा निष्कर्ष काढण्यात आला. शारीरिक संबंध ठेवताना येणाऱ्या अडचणींवर उपचार उपलब्ध असतानाही अनेकदा पुरुष त्यासाठी नकार देतात. ज्याचा परिमाण नातेवसंबंधांवरही होतो. याच पार्श्वभूमीवर इरेक्टाइल डिसफंक्शन (ईडी) बाबत लोकांना असलेली माहिती, त्यावरील उपचार आणि या उपचारांवर प्रभाव टाकणारे घटक यासंदर्भात फायजर अपजॉनने एक सर्वेक्षण केले.

या सर्वेक्षणात १०४२ पुरुष व महिला आणि ३०७ युरॉलॉजिस्ट्स, अँड्रॉलॉजिस्ट्स, सेक्सॉलॉजिस्ट्स आणि कन्सल्टिंग फिजिशिअन (वैद्यकीय सल्लागार) सहभागी झाले होते. दरम्यान अजून एका अभ्यासात असं लक्षात आलं आहे की, ४० वर्षांखालील ३० टक्के पुरुषांना आणि सर्व वयोगटातील २० टक्के पुरुषांना गुप्तांगासंबंधी समस्या भेडसावते. महत्त्वाची बाब म्हणजे सर्वेक्षणात सहभागी ८२ टक्के महिलांनी आपण मैत्रिणींशी चर्चा करणं किवा घरगुती उपचार करण्याचा सल्ला देण्यापेक्षा साथीदाराला डॉक्टरकडे जाऊन उपचार करण्याचा सल्ला देऊ असं सांगितलं आहे.

lokmanas
लोकमानस: नेतान्याहूंची अखेरची धडपड
Congress election manifesto published Caste wise census
जातनिहाय जनगणना, आरक्षण मर्यादावाढ; काँग्रेसच्या जाहीरनाम्याच्या केंद्रस्थानी उपेक्षित, महिला 
ring of fire
विश्लेषण : भूकंपप्रवण क्षेत्र म्हणून ओळखले जाणारे ‘रिंग ऑफ फायर’ नेमके कुठे आहे? या भागात सर्वाधिक भूकंप का होतात?
loksatta readers opinion on editorial readers reaction on loksatta news
लोकमानस : दावा हास्यास्पद; पण दुर्लक्ष नको..

इरेक्टाइल डिसफंक्शनवर (ईडी) उपचार उपलब्ध आहेत. पण ते घेताना आपण मान्यताप्राप्त डॉक्टरांकडूनच घेतले पाहिजेत. भारतात दुर्दैवाने लैंगिक समस्यांवर मोकळेपणाने बोललं जात नाही. पण महिला आता आपल्या समस्यांवर हळूहळू का होईना पण बोलू लागल्या आहेत. एखाद्या पुरुषाने योग्य उपचार घेण्यासाठी महिलेची भूमिका किती महत्त्वाची आहे हे सर्वेक्षणातून ठळकपणे समोर आलं आहे.

सर्वेक्षणातून समोर आलेल्या अन्य काही गोष्टी

ईडीबाबत जागरुकता :
•           ५३ टक्के पुरुष याबाबतीत अनभिज्ञ असून ७८ टक्के महिलांना मात्र याबाबत माहिती आहे
•           ३५ टक्के पुरुष आणि ४७ टक्के महिलांना ईडीसाठी तणाव हा सर्वाधिक कारणीभूत घटक आहे, असे वाटते
•           ७५ टक्के पुरुष आणि ६६ टक्के महिलांना ईडी ही म्हातारपणीची समस्या आहे, असे वाटत नाही

ईडीचा नातेसंबंधांवर होणारा परिणाम
•           ५६ टक्के पुरुष नातेसंबंधावर परिणाम होऊ नये, यासाठी ईडीच्या समस्येबाबत आपल्या साथीदाराशी चर्चा करण्यास तयार
•           २८ टक्के महिला आपल्या साथीदाराने ईडीच्या समस्येच्या निवारणासाठी काही उपाययोजना न केल्यास वेगळे होण्याचा विचार करू शकतात

ईडीवरील उपचाराबाबत दृष्टिकोन
•           ८२ टक्के महिलांना स्वतःच्या मनाने औषध घेणे, मित्रमंडळींशी चर्चा करणे अथवा घरगुती उपाय करणे यापेक्षा डॉक्टरांचा सल्ला घेणे योग्य वाटते
•           ६१ टक्के पुरुष डॉक्टरांचा सल्ला घेऊन औषधे घेण्यास तयार
•           ४२ टक्के पुरुष डॉक्टरांनी दिलेल्या औषधांऐवजी पर्यायी स्वस्त औषधे घेण्याची किंवा फार्मसिस्टने सांगितलेली औषधे घेण्यास तयार असतात

लैंगिक सलगी आणि नातेसंबंध
•           २१ टक्के महिलांना आपला साथीदार शारीरिक समाधान देतो की नाही, याबाबत खात्री नाही
•           ७० टक्के पुरुषांना आपण आपल्या साथीदाराला लैंगिक समाधान देऊ शकतो असे वाटते
•           ८७ टक्के पुरुषांना नातेसंबंधांत लैंगिक सलगी अत्यंत महत्त्वाची आहे असे वाटते

डॉक्टरांचे म्हणणे काय :
•           पुरुषाच्या ईडीबाबतच्या उपचारांमध्ये त्यांचे साथीदार अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतात आणि उपचारांबाबत आणि ते सुरू ठेवायचे की नाही, याबाबतचा निर्णय घेण्यावर ते प्रभाव टाकतात, असे ९६ टक्के डॉक्टरांना वाटते

३४ टक्के पुरुष आपला साथीदार सांगत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घेण्यास तयार आहेत असं या अभ्यासातून समोर आलं आहे. पुरुषांना फक्त उपचारासाठी तयार करणं नाही तर ईडीबाबतच्या उपचारांचे यशापयश, उपचारांची निवड यामध्येही महिला महत्त्वाची भूमिका निभावत असल्याचं समोर आलं आहे.