News Flash

“सतयुगात पुन्हा जन्माला येतील…” शाळेत मुख्याध्यापक असणाऱ्या दांपत्याकडून पोटच्या मुलींचा नरबळी

डंबेल्सने केली हत्या

संग्रहित (PTI)

महिलेने आपल्या पोटच्या दोन मुलींचा नरबळी दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आंध्र प्रदेशातील चित्तूर जिल्ह्यात ही धक्कादायक घटना घडली आहे. रविवारी रात्री आरोपी पद्मजाने डंबेल्सने आपल्या पोटच्या दोन्ही मुलींची हत्या केली. २७ आणि २२ वर्षीय मुलींच्या हत्येमध्ये वडिलांचाही सहभाग होता.

पोलिसांनी चौकशी केली असता आपल्या मुली कलयुग संपल्यानंतर सतयुगात पुन्हा जन्माला येतील असा अजब दावा त्यांनी केला. विशेष म्हणजे आरोपी पद्मजा आणि त्यांचा पती पुरुषोत्तम नायडू दोघेही शाळेत मुख्याध्यापक म्हणून काम करतात. मोठ्या मुलीने भोपाळ येथून मास्टर्स डिग्री घेतली होती. तसंच मुंबईत ए आर रहमान संगीत विद्यालयात शिक्षण घेत होती. लॉकडाउनमध्ये ती घरी परतली होती. तर छोटी मुलगी बीबीए पदवीधर होती.

आणखी वाचा- लव्ह मॅरेजला आई-वडिलांचा विरोध, प्रेयसीची भारतात, तर प्रियकराची दुबईमध्ये आत्महत्या

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लॉकडाउन काळात दांपत्य विचित्र पद्धतीने वागत होतं. रविवारी घरातून मोठमोठ्याने येणारा आवाज ऐकून शेजाऱ्यांनी पोलिसांना केला. पोलिसांनी घरात घुसण्याचा प्रयत्न केला असता दांपत्याने अडवलं. पण जेव्हा पोलीस जबरदस्तीने घुसले तेव्हा त्यांनी समोरील दृश्य पाहून धक्का बसला.

आणखी वाचा- धक्कादायक! एकाच कुटुंबातील चार महिलांवर बलात्कार

एका मुलीचा मृतदेह पूजेच्या रुममध्ये तर दुसरा मृतदेह दुसऱ्या एका रुममध्ये होता. दोन्ही मुलींच्या अंगावर लाल कपडे होते. पोलिसांनी दांपत्याला अटक केली असून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 25, 2021 12:27 pm

Web Title: andhra pradesh mother sacrifices daughters sgy 87
Next Stories
1 एका कुटुंबातील एकच सदस्य राजकारणात असावा असा कायदा मोदींनी केल्यास…; ममतांच्या भाच्याचा हल्लाबोल
2 भारतीय सैन्याने सिक्कीममध्ये चीनला शिकवला धडा, PLA चे २० सैनिक जखमी
3 Coronavirus – देशभरात २४ तासांत १३१ रुग्णांचा मृत्यू , १३ हजार २०३ नवे करोनाबाधित
Just Now!
X