News Flash

आंध्रच्या विशेष दर्जासाठी वायएसआर काँग्रेस, टीडीपी आक्रमक; महामार्ग रोखले

टीडीपीच्या खासदारांचे संसद भवन परिसरात निषेध आंदोलन

आंध्रच्या विशेष दर्जासाठी वायएसआर काँग्रेस, टीडीपी आक्रमक; महामार्ग रोखले
आंध्र प्रदेशला विशेष राज्याच्या दर्जाच्या मागणीसाठी वायएसआर काँग्रेस आणि टीडीपीने राज्य बंद पुकारला. तसेच ठिकठिकाणी महामार्गावर चक्का जाम आंदोलन केले.

वायएसआर काँग्रेस, तेलगू देसम पार्टी या पक्षांसह इतर विरोधी पक्षांनी आंध्रप्रदेशला विशेष राज्याचा दर्जा मिळावा या मागणीसाठी गुरुवारी आंध्र प्रदेश बंद पुकारला. तसेच राज्यातील सर्व राष्ट्रीय महामार्गावर चक्का जाम आंदोलन सुरु केले आहे.


वायएसआर आणि टीडीपीने विजयवाडासहित राज्याच्या अनेक भागातील महामार्ग रोखून धरले आहेत. यामुळे वाहतुक व्यवस्था कोलमडली. दरम्यान, टीडीपीच्या खासदारांनी दिल्लीत संसद भवन परिसरात आंध्रप्रदेशच्या विशेष राज्याच्या मागणीसाठी केंद्र सरकारविरोधात निषेध आंदोलन केले.


‘एनडीए सदस्य या नात्याने भाजपा आपल्या राज्याला न्याय देईल अशी अपेक्षा होती, मात्र काहीच झालं नाही’ अशा शब्दांत नाराजी व्यक्त करीत तेलगू देसम पक्षाचे (टीडीपी) सर्वेसर्वा चंद्राबाबू नायडू यांनी राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून (एनडीए) बाहेर पडण्याची घोषणा केली होती.

आंध्र प्रदेशला विशेष दर्जा द्यावा, अशी ‘तेलगू देसम’ची मागणी आहे. मात्र, केंद्र सरकारकडून याबाबत अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने चंद्राबाबू नायडू आक्रमक झाले आहेत. निषेधाचे पहिले पाऊल म्हणून टीडीपीचे दोन्ही केंद्रीय मंत्री अशोक गजपती राजू आणि वाय. एस. चौधरी यांनी आठवड्याभरापूर्वी राजीनामा दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी आपण अनेकदा स्वतः संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण ते दुरध्वनीवर आले नाही, असा आरोपही नायडूंनी केला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 22, 2018 12:08 pm

Web Title: andhra special status demand aggressive attack by the yrs congress and tdp call for andhra pradesh shutdown
Next Stories
1 भारतातील निवडणुका नि:पक्षपाती होण्यासाठी फेसबुक कटिबद्ध – मार्क झुकेरबर्ग
2 पंतप्रधान शहरी आवास योजनेचे काम संथगतीने सुरु; केवळ ८ टक्केच घरबांधणीचे लक्ष्य साध्य
3 २०१९ मध्ये भाजपा बहुमतासोबत पुनरागमन करेल – अमित शहा
Just Now!
X