News Flash

वर्गाची काच फोडून चक्क आत शिरले काळवीट

वनविभागाकडून काळविटाची सुटका

फोटो सौजन्य-एएनआय

समजा शाळेतला वर्ग सुरु असताना जर काळवीट थेट खिडकीतून वर्गात आले तर? ऐकायला कदाचित ही घटना विचित्र वाटू शकते पण ती खरोखर घडली आहे. उत्तर प्रदेशातील मुरादाबाद या ठिकाणी असलेल्या पाकबरा या गावात ही घटना घडली आहे. एका शाळेतील वर्गाच्या काचा फोडून एक काळवीट वर्गात शिरले. या वर्गातून त्याला बाहेर पडता येईना. त्या काळविटाने बाहेर पडण्यासाठी बरेच प्रयत्न केले. पण त्याला बाहेर जाता आलेच नाही.

शेवटी काही वेळापूर्वी वन विभागाच्या अधिकाऱ्यानी या काळविटाची सुटका करून त्याला जंगलात सोडून दिले आहे. ही शाळा कोणती होती? ते काळवीट तिथे कसे आले हे अद्याप समजू शकलेले नाही. एएनआय या वृत्तसंस्थेने या संदर्भाले वृत्त दिले आहे. या काळवीटाचा वर्गात अडकलेला व्हिडिओही एएनआयने ट्विट केला आहे. वर्ग रिकामाच असल्याचे दृश्यांमध्ये दिसते आहे. तसेच काळवीट बाहेर पडण्यासाठी प्रयत्न करत असल्याचेही दिसते आहे. मात्र त्याला बाहेर पडता आलेच नाही. अखेर शाळा प्रशासनाने वन विभागाच्या अधिकाऱ्यांना बोलावले आणि त्यांनीच त्याची सुटका केली.

पाहा व्हिडिओ

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 28, 2018 10:53 pm

Web Title: antelope which had broken into a classroom after breaking the glass window at a school in moradabads pakbara rescued by forest dept
Next Stories
1 भ्रष्टाचार करणाऱ्यांना तुरुंगवास अटळ, एकालाही सोडणार नाही-पंतप्रधान
2 अभिनेत्री तमन्ना भाटियाच्या दिशेने बूट भिरकावला, तरूण ताब्यात
3 हिंमत असेल तर मोहम्मद पैगंबरांवर सिनेमा काढून दाखवा, गिरीराज सिंह यांचे संजय लीला भन्साळींना आव्हान
Just Now!
X