अॅपलच्या आयफोन ७ आणि आयफोन ७ प्लस या मोबाईल फोन्सची उत्सुकता शिगेला पोहोचली असतानाच उद्या अॅपल वॉच २ लाँच होण्याची शक्यता आहे. कुपर्टीनोमध्ये उद्या एका कार्यक्रमात वॉचचे लाँचिंग केले जाणार असून अॅपल वॉचप्रमाणेच अॅपल वॉच टूची स्क्रीन साईजसारखीच असेल. पण डिस्प्ले लहान असणार आहे.
अॅपल वॉच २ मध्ये वेगवान टीएसएमसी प्रोसेसर आणि जीपीएस, जास्त क्षमता असलेली बॅटरी आणि वॉटरप्रुफ हे नवीन फिचर असतील अशी शक्यता वर्तवली जात आहे. अॅपल वॉच २ मध्ये एलटीई सपोर्ट असेल अशी चर्चा होती. मात्र एलटीई असलेल्या स्मार्ट वॉच जास्त बॅटरी वापरली जाते अशी तक्रार आहे. डिस्प्ले लहान असल्याने बॅटरी जास्त लागणार नाही. मात्र तरीदेखील तुर्तास अॅपल वॉच २ एलटीई सपोर्ट नसेल. अॅपलने एलटीईचा पर्याय वॉच ३ मध्ये आणण्यासाठी ठेवला असावा असे जाणकारांचे म्हणणे आहे.
अॅपलने २०१५ मध्ये स्मार्टवॉच लाँच केले होते. अॅपल वॉचला ग्राहकांनीही भरभरुन प्रतिसाद दिला. भारतात नोव्हेंबर २०१५ मध्ये अॅपल वॉच लाँच करण्यात आले. भारतात अॅपल वॉचची किंमत ३६, ९९९ रुपये ऐवढी होती. अमेरिकेपेक्षा भारतातले हे दर जास्त होते. वायफाय, ब्लूटूथ कनेक्टिव्हीटी, ५१२ एमबी रॅम आणि ८ जीबी ROM असे फिचर्स आयफोनमध्ये दण्यात आले होते. याशिवाय ह्रदयाचे ठोके मोजणारे सेन्सरही या वॉचमध्ये देण्यात आले होते.
स्मार्टवॉचच्या बाजारात सध्या मंदी असल्याचे जाणकारांचे मत आहे. स्मार्टवॉचच्या विक्रीत ३२ टक्क्यांनी घट झाल्याचे सांगितले जाते. पण या मार्केटमध्ये अॅपल वॉच अग्रस्थानी आहेत.