28 September 2020

News Flash

कुलभूषण जाधव प्रकरणात तीन न्यायमित्रांची नेमणूक

भारताला जाधव यांच्या वतीने वकील देऊन आव्हान याचिकेची संधी

संग्रहित छायाचित्र

निवृत्त भारतीय नौदल अधिकारी कुलभूषण जाधव यांच्यासाठी वकील  नेमण्याचा आदेश देऊन पाकिस्तानच्या इस्लामाबाद उच्च न्यायालयाने भारताला आणखी एक संधी दिली असून तीन वकिलांची न्यायमित्र म्हणून नेमणूक केली आहे.

न्यायालयाने असा आदेश दिला की, या प्रकरणी सुनावणीसाठी मोठय़ा पीठाची स्थापना करावी. तसेच ३ सप्टेंबरला या पीठापुढे दुपारी दोन वाजता जाधव यांना लष्करी न्यायालयाने सुनावलेल्या मृत्युदंडाच्या शिक्षेवर सुनावणी होईल. अबीद हुसेन मंटो व हमीद खान हे सर्वोच्च न्यायालयातील वरिष्ठ वकील तसेच माजी महाधिवक्ता मखदूम अली खान यांना न्यायामित्र म्हणून नेमण्यात येत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 5, 2020 12:00 am

Web Title: appointment of three justices in kulbhushan jadhav case abn 97
Next Stories
1 एच १ बी व्हिसाधारकांना ट्रम्प यांचा पुन्हा धक्का
2 करोनामुळे १.६ अब्ज विद्यार्थ्यांचे शिक्षण धोक्यात
3 प्रचंड स्फोटानं हादरली लेबनॉनची राजधानी बैरूट, शेकडो जखमी
Just Now!
X