News Flash

TRP Scam : अर्णब गोस्वामीने मला १२ हजार डॉलर्स आणि ४० लाख रुपये दिले – पार्थो दासगुप्ता

मुंबई पोलिसांना लेखी दिलेल्या जवाबात केला आहे दावा

संग्रहीत छायाचित्र

बहुचर्चित टीआरपी घोटाळ्यातील आरोपी ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च काउन्सिलचे (बार्क) माजी सीईओ पार्थो दासगुप्ता यांनी मुंबई पोलिसांना दिलेल्या लेखी जवाबात दावा केला आहे की, रिपब्लिक वाहिनीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामीकडून त्यांना १२ हजार डॉलर मिळाले होते. याशिवाय, दोन विशेष सुट्यांसह तीन वर्षांमध्ये त्यांना एकूण ४० लाख रुपये मिळाले, ज्यासाठी त्यांना रिपब्लिक वाहिनीच्या बाजूने रेटींगमध्ये फेरफार करायची होती. टीआरपीमध्ये फेरफार करण्याची ही माहिती त्या पुरवणी आरोपपत्रातून मिळाली आहे, जे टीआरपी घोटाळ्याप्रकरणी पोलिसांकडून दाखल करण्यात आले आहे.

३ हजार ६०० पानांचे पुरवणी आरोपपत्र मुंबई पोलिसांकडून ११ जानेवारी रोजी दाखल करण्यात आले होते. ज्यामध्ये बार्क फॉरेन्सिक ऑडिट रिपोर्टचा देखील समावेश होता. याचबरोबर दासगुप्ता आणि गोस्वामी यांच्यातील व्हॉट्सअप चॅटचा देखील समावेश आहे. याशिवाय बार्कचे माजी कर्मचारी आणि केबल ऑपरेटरसह ५९ जणांच्या विधानांचा समावेश आहे. इंडियन एक्स्प्रेसने या संदर्भात वृत्त दिलं आहे.

ऑडिट रिपोर्टमध्ये अनेक न्यूज चॅनल, रिपब्लिक टीव्ही, टाईम्स नाऊ आणि आजतक साठी बार्कचे वरिष्ठ अधिकाऱ्यांद्वारे कथित टीरआरीप फेरफार आणि रेटींगच्या फिक्सिंग बाबत सांगण्यात आलेलं आहे. पार्थो दासगुप्ता, रोमील रामगढिया, विकास खनचंदानी यांच्या विरोधात पुरवणी आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. सर्वात अगोदर १२ लोकांविरोधात नोव्हेंबरमध्ये आरोपपत्र दाखल कऱण्यात आलं होतं. दुसऱ्या आरोपपत्रानुसार दासगुप्ताचे म्हणणे क्राईम इंटेलिजन्स युनिटने ९ नोव्हेंबर रोजी रेकॉर्ड केले होते.

TRP Scam : बार्कचे माजी सीईओ पार्थो दासगुप्ता यांचा कोर्टानं फेटाळला जामीन

दासगुप्ताने सांगितले आहे की, “मी अर्नब गोस्वामीला २००४ पासून ओळखतो. आम्ही टाईम्स नाऊ मध्ये सोबत काम करत होतो. मी बार्कचा सीईओ म्हणून २०१३ मध्ये काम सुरू केले होते आणि अर्णब गोस्वामीने २०१७ मध्ये रिपब्लिक चॅनल सुरू केले होते. रिपब्लिक चॅनल सुरू करण्या अगोदर त्याने माझ्याशी अनेकदा योजनेबाबत चर्चा केली होती व रेटींगसाठी मदत करण्याचे देखील म्हटले होते. गोस्वमीला हे माहिती होतं की, मला माहिती आहे टीआरपी प्रणाली कशाप्रकारे काम करते?”

“रिपब्लिक टीव्हीचे रेटिंग थांबवा, IBF सदस्यत्वही रद्द करा”

तसचे, पोलिसांना दिलेल्या जवाबात दासगुप्ता म्हणतात, “रिपब्लिक टीव्हीला क्रमांक एकची रेटींग मिळावी, यासाठी मी आपल्या टीम सोबत काम करायचो व टीआरपीमध्ये फेरफार करायचो. हे जवळपास २०१७ पासून २०१९ पर्यंत सुरू होते.२०१७ मध्ये अर्णब गोस्वामीने मला माझ्या कुटंबासोबतच्या फ्रान्स व स्वित्झर्लंडच्या सहलीसाठी जवळपास ६ हजार डॉलर कॅश दिले. यानंतर २०१९ मध्ये देखील त्यांनी मला तेवढीच रक्कम दिली. २०१७ मध्ये देखील गोस्वामीने माझी भेट घेतली आणि मला २० लाख रुपये कॅश दिले. २०१८ व २०१९ मध्ये त्यांनी मला प्रत्येक वेळी १० लाख रुपये दिले.”

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 25, 2021 12:33 pm

Web Title: arnab goswami paid me 12000 dollers and rs 40 lakh partho dasgupta msr 87
Next Stories
1 “सतयुगात पुन्हा जन्माला येतील…” शाळेत मुख्याध्यापक असणाऱ्या दांपत्याकडून पोटच्या मुलींचा नरबळी
2 एका कुटुंबातील एकच सदस्य राजकारणात असावा असा कायदा मोदींनी केल्यास…; ममतांच्या भाच्याचा हल्लाबोल
3 भारतीय सैन्याने सिक्कीममध्ये चीनला शिकवला धडा, PLA चे २० सैनिक जखमी
Just Now!
X