इतर अनेक देशांपेक्षा भारत गुंतवणुकीवर जास्त परतावा देईल असा दिलासा अर्थमंत्री अरूण जेटली यांनी दिला आहे. परदेशी गुंतवणुकीमुळे भारतालाही पायाभूत सुविधा व इतर क्षेत्रात आर्थिक साधने उपलब्ध होतील असे मत त्यांनी व्यक्त केले.
आपल्या देशात मेक इन इंडिया योजनेच्या माध्यमातून उत्पादन वाढवण्यासाठी पुढाकार घेण्यात आला आहे. उद्योग सुरू करण्यास अनुकूल वातावरण निर्माण करण्यात येत आहे. इतर देशांपेक्षा भारतातील गुंतवणुकीतून परदेशी गुंतवणूकदारांना फायदाच होईल. परदेशी गुंतवणुकीने आर्थिक साधने निर्माण होणार असल्याने रेल्वे, महामार्ग व वीज क्षेत्रात निधी वापरता येईल व काही प्रकल्प या परदेशी गुंतवणुकीवर विसंबून आहेत. परदेशी गुंतवणूकदारांना भेटण्यासाठी जेटली गेली दोन दिवस सिंगापूरमध्ये आहेत. उद्योगास अनुकूलता वातावरण निर्माण करण्यात येत आहे. आता पूर्वीच्या किचकट प्रक्रिया काढून टाकण्यात आल्या आहेत. डिजिटल इंडिया व मेक इन इंडिया यामुळे उत्पादन क्षेत्रात चालना मिळणार आहे. आपल्या मते काही राज्ये विजेसाठी पुरेसा दर आकारात नाहीत त्यामुळे वीज वितरण कंपन्यांची आर्थिक स्थिती वाईट आहे. त्यामुळे अशा राज्यांमध्ये सरकारी बँका तूट भरून काढण्यासाठी या कंपन्यांना निधी देणार नाही व त्यांनी तशी अपेक्षाही ठेवणे चुकीचे आहे.