दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा मिळावा या मागणीसाठी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल येत्या एक मार्चपासून आमरण उपोषणााला बसणार आहेत. मी एक मार्चपासून उपोषण सुरु करणार आहे. दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा मिळेपर्यंत मी उपोषण सोडणार नाही. मी मृत्यूला सामोरा जायलाही तयार आहे असे केजरीवाल यांनी शनिवारी दिल्ली विधानसभेत सांगितले.

दिल्ली सोडून संपूर्ण देशात लोकशाही आहे. लोक मत देऊन सरकार निवडतात पण सरकारला कुठलेही अधिकार नाहीत. त्यासाठी आम्ही एक मार्चपासून चळवळ चालू करणार आहोत. दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा मिळेपर्यंत मी आमरण उपोषणाला करणार आहे असे केजरीवाल यांनी म्हटले आहे.

भ्रष्ट अधिकाऱ्यांविरोधात चौकशीचे अधिकार दिल्ली सरकारला नाही तर केंद्र सरकारला आहेत असा सर्वोच्च न्यालालयाने मागच्या आठवडयात निकाल दिला. त्यानंतर केजरीवालांनी पूर्ण राज्याच्या दर्जासाठी उपोषणाचा निर्णय घेतला आहे. दिल्ली देशाची राजधानी असून कायदा-सुव्यवस्था संभाळण्याचे सर्व अधिकार केंद्राकडे आहेत.