आसाममध्ये     उल्फा दहशतवाद्यांशी सुरू असलेल्या चकमकीत भारतीय सैन्याचे तीन जवान धारातीर्थी पडले आहेत. दहशतवाद्यांनी केलेल्या आयईडीच्या स्फोटात या जवानांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. आसामच्या तिनसुकिया येथील पेंगरी येथे ही चकमक सुरू आहे.  या हल्ल्यात आणखी चार जवानही जखमी झाले आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, अजूनही सुरक्षा दले आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. दरम्यान, जखमी जवानांना घटनास्थळावरून हलविण्यात आले असून त्यांना नजीकच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. युनायटेड लिबरेशन फ्रंट ऑफ आसाम ( उल्फा) ही आसाममधील फुटीरतावादी संघटना आहे. केंद्र सरकारने या संघटनेवर १९९० मध्ये बंदी घातली होती.
सविस्तर वृत्त लवकरच…