News Flash

चार राज्यं आणि एका केंद्रशासित प्रदेशात २० कोटी मतदार बजावणार हक्क; मोदींचं चार भाषांमध्ये ट्विट

आज एकूण ४७५ विधानसभा जागांसाठी मतदान होत आहे

संग्रहित (Source: Twitter/@BJP4India)

तामिळनाडू, केरळ, पश्चिम बंगाल, आसाम आणि पुद्दुचेरीमध्ये आज एकूण ४७५ विधानसभा जागांसाठी मतदान होत आहे. तामिळनाडू आणि केरळमध्ये एकाच टप्प्यात मतदान होणार असून अण्णाद्रुमूक आणि एलडीएफ सरकारचं भवितव्य ठरणार आहे. तर दुसरीकडे आसाम आणि पश्चिम बंगालमध्ये तिसऱ्या टप्प्यातील मतदान होणार आहे. आसाममध्ये हा मतदानाचा शेवटचा टप्पा आहे.

तामिळनाडूत सहा कोटी मतदार बजावणार हक्क
तामिळनाडूत २३४ विधानसभा जागांसाठी मतदान होणार असून सहा कोटी मतदार मतदानाचा हक्क बजावतील. यावेळी ३९९८ उमेदवारांचं भवितव्य मतदानपेटीत बंद होणार आहे. मतदानाला सुरुवात झाल्यानंतर लगेचच अभिनेता रजनीकांत यांनी मतदानाचा हक्क बजावला. याशिवाय कमल हासन आपल्या मुलींसोबत पोहोचले होते.

मोदींचं आवाहन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत चार राज्यं आणि एका केंद्रशासित प्रदेशातील मतदारांना रेकॉर्डब्रेक मतदान करण्याचं आवाहन केलं आहे. यावेळी त्यांनी खासकरुन तरुणांना विनंती केली आहे. तामिळनाडू, केरळ, आसाम, पश्चिम बंगाल आणि पुद्दुचेरीमधील मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी मोदींनी चार भाषांमध्ये ट्विट केलं आहे.

तामिळनाडूत २३४, केरळमध्ये १४०, आसाममध्ये ४०, पश्चिम बंगालमध्ये ३१ आणि पुद्दुचेरीत ३० जागांसाठी आज मतदान होत आहे. विधानसभा निवडणुकांसोबतच मल्लपूरम आणि कन्याकुमार या दोन जागांसाठीदेखील मतदान होत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 6, 2021 8:47 am

Web Title: assembly election polling begins in tamil nadu assam west bengal kerala puducherry sgy 87
Next Stories
1 पुतिन यांना २०२६ पर्यंत सत्तेवर राहण्याचा मार्ग मोकळा
2 देशात प्रथमच दैनंदिन रुग्णवाढ एक लाखापार
3 राफेल व्यवहारात दलाली!
Just Now!
X