News Flash

JNU बाहेर तीन विद्यार्थीनीसमोर हस्तमैथुन, रिक्षाचालक अटकेत

मुलींनी आरडाओरडा केल्यानंतर सुरक्षारक्षकांनी त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.

(संग्रहित छायाचित्र)

दिल्लीमधील जवाहरलाल नेहरू विद्यापीठाबाहेर (जेएनयू) एका विकृत रिक्षाचालकाने तीन विद्यार्थ्याींनीसमोर हस्तमैथुन केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी २७ वर्षी रिक्षाचालकाला अटक केली आहे. ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव अखिलेश कुमार असून तो उत्तरप्रदेशातील कन्नौज येथील रहिवासी आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा प्रकार १७ सप्टेंबर रोजी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास घडला आहे. या प्रकारानंतर विद्यार्थींनीनी किशनगड पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दिली होती. त्यानुसार आरोपीला घटनास्थळावरून अटक करण्यात आली.

स्थानिक प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार, रात्री दहा वाजण्याच्या सुमारास विद्यार्थींनी जेएनयूमधील वसतिगृहात परतत होत्या. त्यावेळी गेटवर उभ्या असलेल्या रिक्षाचालकाने त्यांना पाहून हस्तमैथुन करण्यास सुरुवात केली. त्यामुळे मुलींनी आरडाओरडा केल्यानंतर सुरक्षारक्षकांनी त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. या सर्व प्रकारानंतर मुलींनी दिलेल्या माहितीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असूनआरोपीला अटक केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 27, 2019 3:44 pm

Web Title: auto driver held for flashing three students outside jnu gate nck 90
Next Stories
1 गोरखपूर अर्भकं मृत्यूप्रकरणी डॉ. काफील खान निर्दोष, विभागीय चौकशीत क्लीनचीट
2 हनी ट्रॅप : काँग्रेस नेते मानक अग्रवाल यांनी आरएसएसबद्दल केलं ‘हे’ खळबळजनक विधान
3 काँग्रेसने मोदींना दिल्या ‘जागतिक पर्यटन दिना’च्या शुभेच्छा
Just Now!
X