03 March 2021

News Flash

अयोध्या रेल्वे स्टेशनचाही चेहरामोहरा बदलणार; मंदिराच्या प्रतिकृतीप्रमाणं होणार पुनर्बांधणी

राम मंदिराच्या भूमिपूजन सोहळ्यासाठी अयोध्येतील सर्व सार्वजनिक ठिकाणं सजली

अयोध्या : रेल्वे स्टेशनचाही आता चेहरामोहरा बदलणार.

राम मंदिराचा भूमिपूजन सोहळा अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यानंतर प्रत्यक्ष मंदिर उभारणीला सुरुवात होईल. दरम्यान, भूमिपूजन सोहळ्यासाठी अयोध्येत जय्यत तयारी सुरु आहे. सर्व सार्वजनिक ठिकाणं नव्या रुपात-ढंगात सजली आहेत. यात आता आणखी एका ठिकाणाची भर पडणार आहे, ती म्हणजे रेल्वे स्टेशनची. आता अयोध्येच्या रेल्वे स्टेशनचा चेहरामोहरा बदलण्यात येणार आहे. राम मंदिराच्या प्रतिकृतीच्या रुपात या रेल्वे स्टेशनची पुनर्बांधणी केली जाणार आहे. यासाठी रेल्वे मंत्रालयानं निधीमध्येही भरघोस वाढही केली आहे.

आणखी वाचा- ड्रोन, शहरात प्रवेशबंदी, पाचपेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यास मनाई; अयोध्येत पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

प्रत्यक्ष राम मंदिर तयार होण्यापूर्वीच पुढील दोन वर्षात अयोध्यावासियांना मंदिराच्या प्रतिकृती स्वरुपात रेल्वे स्टेशन मिळणार आहे. या स्टेशनच्या पुनर्विकासासाठी रेल्वेने बजेटमध्ये वाढ केली असून ८० कोटींवरुन ती १०४ कोटी रुपयांपर्यंत वाढवण्यात आली आहे. रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की, हा प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करण्यात येणार आहे.

आणखी वाचा- १५० पेक्षा जास्त नद्या आणि तीन समुद्रांचे पाणी घेऊन अयोध्येत पोहोचले ‘ते’ दोन भाऊ

यासंदर्भात रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांनी रविवारी ट्विट केलं होतं. यात त्यांनी म्हटलं, “करोडो लोक राम मंदिराला भेट देण्यासाठी येतील. त्यामुळे रेल्वे मंत्रालयानं पतंप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली अयोध्या स्टेशनचा पुनर्विकास करण्याचं ठरवलं आहे.”

सध्याचं अयोध्या स्टेशनची रचना ही देखील मंदिराप्रमाणेच आहे. काही वर्षांपूर्वीच त्याच्या पुनर्विकासाचा निर्णय झाला होता. त्यानंतर आता याचं नवं डिझाईन नव्या राम मंदिराच्या पार्श्वभूमीवर असणार आहे. त्याचबरोबर यामध्ये प्रवाशांच्या सोयीसुविधांबरोबरच मोठ्या प्रमाणावर होणारी गर्दी हाताळण्यासाठी क्षमताही वाढवण्यात येणार आहेत.

या रेल्वे स्टेशनचा पुनर्विकास दोन टप्प्यात केला जाणार आहे. पहिल्या टप्प्यात स्टेशनमधील प्लॅटफॉर्मचा भाग विकसित केला जाईल. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात स्टेशनच्या नव्या इमारतीचं बांधकाम सुरु होईल. यामध्ये अनेक टॉयलेट्स, डॉर्मिटरीज, तिकीट खिडक्या आणि मोकळी जागा असणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 3, 2020 1:31 pm

Web Title: ayodhya railway station to be redeveloped on temple model budget raised aau 85
Next Stories
1 रशियात ‘या’ महिन्यात डॉक्टर, शिक्षकांना मिळणार करोना लसीचा पहिला डोस
2 बकरी ईदच्या मटण वाटपावरुन केला भावाचा खून तर बहिणीला केलं जखमी
3 पंतप्रधान मोदींना लता मंगेशकर यांच्या रक्षाबंधनाच्या खास शुभेच्छा
Just Now!
X