अ‍ॅलोपॅथी उपचारपद्धती व अ‍ॅलोपॅथी डॉक्टरांबाबत केलेल्या विधानांमुळे योगगुरू आणि पतंजली आयुर्वेदचे सहसंस्थापक बाबा रामदेव वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. बाबा रामदेव यांनी केलेल्या वक्तव्यावर इंडियन मेडिकल असोसिएशन अर्थात आयएमएने आक्रमक भूमिका घेतली आहे. बाबा रामदेव यांना अटक करण्याचा हॅशटॅगही सोशल मीडियावर ट्रेंडिंगमध्ये होता. त्यावर बोलताना बाबा रामदेव यांनी “कुणाचा बापही आपल्याला अटक करू शकत नाही,” असं विधान केलं. त्यावरून तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांनी बाबा रामदेव यांच्या चांगल्याच भडकल्या. मोदी आणि शाह यांचा नामोल्लेख टाळत त्यांनी बाबा रामदेव यांना सुनावलं.

देश करोना संकटाला तोंड देत असतानाच बाबा रामदेव यांनी अ‍ॅलोपॅथी उपचारपद्धतीची थट्टा उडवली होती. त्याचबरोबर अ‍ॅलोपॅथी डॉक्टरांबाबतही त्यांनी अवमानजनक वक्तव्य केलं. बाबा रामदेव यांनी केलेल्या विधानांचा निषेध करत आयएमएने बाबा रामदेव यांच्याविरुद्ध साथरोग कायद्यातंर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. बाबा रामदेव यांच्याविरोधात आयएमएने आक्रमक पवित्रा घेत त्यांना १५ दिवसात माफी मागावी अन्यथा १००० कोटी रुपयांची भरपाई द्यावी, अशी नोटीस बजावली आहे.

lok sabha election 2024 dcm devendra fadnavis slams uddhav thackeray in daryapur rally
सत्ता गेल्याने उद्धव ठाकरे भ्रमिष्ट! उपमुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीसांची टीका
PM Narendra Modis speech in wardha is begins with the remembrance of Rashtrasant Tukdoji Maharaj
‘चरा चरात वास करणारी गुरुदेव शक्ती’ पंतप्रधान नरेंद्र मोदी असे का म्हणाले…
Prime Minister Narendra Modi criticism of the India front as rumors about CAA by the opposition
‘सीएए’बाबत विरोधकांकडून अफवा; पंतप्रधान मोदी यांचे ‘इंडिया’ आघाडीवर टीकास्त्र
FIR registered, Dhirendra Shastri Bageshwar Baba, mohadi police station, bhandara district, controversial statement
धीरेंद्र शास्त्री उर्फ बागेश्वर धाम बाबांना आक्षेपार्ह विधान भोवले, गुन्हा दाखल; जाणून घ्या प्रकरण….

बाबा रामदेव यांना अटक करण्याची मागणीही होत असून, त्यावर बोलताना रामदेव यांनी “कुणाचा बापही आपल्याला अटक करू शकत नाही,” असं विधान केलं. हे विधान व्हायरल झालं असून, त्यावर तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांना संताप अनावर झाला. त्यांनी ट्विट करत बाबा रामदेव यांना सुनावलं आहे. या ट्विट मधून मोईत्रा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावरही नामोल्लेख टाळत टीकास्त्र डागलं आहे.

“स्वामी रामदेवला कुणाचा बापही अटक करू शकत नाही.” रामकृष्ण यादव, आपण खरं बोललात. तुमचा भाऊ आणि बाप तर विरोधकांना अटक करण्यात गुंतले आहेत,” असं म्हणत महुआ मोईत्रा यांनी बाबा रामदेव यांना प्रत्युत्तर दिलं.

पंतप्रधान मोदींना ‘आयएमए’चे पत्र

बाबा रामदेव यांनी लसीकरणाबाबत चालवलेली चुकीच्या माहितीची मोहीम थांबवण्यात यावी. रामदेव यांची अशा पद्धतीची वक्तव्ये देशद्रोही स्वरूपाची असून, त्यांच्याविरुद्ध देशद्रोहाच्या आरोपाखाली दिरंगाई न करता गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करणारे पत्र आयएमएने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवले आहे. ‘करोना लशीच्या दोन्ही मात्रा घेतल्यानंतरही डॉक्टर मंडळी मृत्यूमुखी पडली आहेत’, या रामदेव यांच्या दाव्यामुळे लोकांच्या मनात संशय उत्पन्न होईल. त्यामुळे याला आळा घालण्याची गरच असल्याचे या पत्रात म्हटले आहे.