अभिनेता अक्षय कुमार याची प्रमुख भूमिका असलेल्या ‘बेबी’ या हिंदी चित्रपटावर पाकिस्तानमध्ये बंदी घालण्यात आली आहे. हा चित्रपट मुस्लिमविरोधी असल्याचे सांगत ही बंदी घालण्यात आली. प्रसिद्ध दिग्दर्शक नीरज पांडे यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट शुक्रवारीच भारतात प्रदर्शित झाला.
या चित्रपटाच्या माध्यमातून मुस्लिमांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे पाकिस्तानी सेन्सॉर बोर्डाचे मत आहे. त्यामुळेच तिथे हा चित्रपट प्रदर्शित करण्यावर बंदी घालण्यात आली. नीरज पांडे यांनी मात्र हा आरोप फेटाळून लावला आहे. या चित्रपटात मुस्लिमविरोधी काहीही दाखविण्यात आलेले नाही, असे त्यांनी सांगितले. पाकिस्तानात या चित्रपटाच्या सीडी आणि डीव्हीडी विकण्यावरही बंदी घालण्यात आली आहे.