करोनाच्या पार्श्वभूमीवर झारखंड सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. तलाव आणि नदी काठी छठपूजेवर राज्य सरकारने बंदी घातली आहे.

छठपूजेच्या निमित्ताने भाविक मोठय़ा संख्येने तलाव, नदी किंवा पाण्याच्या स्रोताजवळ एकत्र येतात. जल आणि उगवत्या सूर्याला नमस्कार करून स्नान करतात आणि तिथेच पूजा करतात. अशावेळी करोना पसरण्याची मोठी भीती आहे. राज्य सरकारने जारी केलेल्या सूचनेनुसार पाण्याच्या माध्यमातून करोना पसरण्याची शक्यता आहे. म्हणून राज्यात आतापर्यंत स्वीमिंग पूल बंद ठेवण्यात आले आहे. छठपूजेला भाविक जल स्रोताजवळ स्नान करतात, तसेच या ठिकाणी गर्दीला नियंत्रित करणे कठीण असते. म्हणून राज्य सरकारने सार्वजनिक ठिकाणी छठपूजा, पूजेच्या आयोजन करण्यावर बंदी घातली आहे. या आदेशानुसार सार्वजनिक ठिकाणी जलस्रोतांजवळ दुकान, स्टॉल लावणे, विद्युत रोषणाई करणे, फटाके वाजवणे यावर बंदी घालण्यात आली आहे. तसेच छठपूजेच्या निमित्ताने सार्वजनिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यावरही बंदी घातली आहे.