आयपीएलमधील स्पॉट फिक्सिंगमध्ये भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) शिस्तपालन समितीने राजस्थान रॉयल्सचे क्रिकेटपटू एस. श्रीशांत आणि अंकित चव्हाण यांच्यावर आजीवन बंदी घालण्याचा निर्णय घेतला. 
बीसीसीआयचे भ्रष्टाचारविरोधी पथकाचे रवी सवानी यांच्या समितीने स्पॉट फिक्सिंगप्रकरणी श्रीशांतसह, अंकीत चव्हाण, अजित चंडिला आणि अमित सिंग यांना दोषी ठरवले होते. त्यांच्यावर पाच वर्षे ते आजन्म या दरम्यान बंदी घालण्याची शिफारस करण्यात आली आहे. रवी सवानी यांच्या समितीचा अहवाल बीसीसीआयकडे दाखल करण्यात आला असून, त्यावर शुक्रवारी शिस्तपालन समितीमध्ये चर्चा झाली. त्यामध्ये हा निर्णय घेण्यात आला.
फिक्सिंग कायद्याने गुन्हा ठरवा
आयपीएलच्या गेल्या पर्वात स्पॉट फिक्सिंग केल्याचा आरोप श्रीशांत, चंडिला आणि चव्हाण यांच्यावर आहे. याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी त्यांना अटक केली होती. सध्या हे सर्वजण जामीनावर बाहेर आहेत. सवानी यांच्या समितीने या सर्वांना वेगवेगळ्या आरोपांमध्ये दोषी ठरवले आहे. आयपीएलमधील काही सामन्यांमध्ये या तिघांनी आपल्या काही षटकांमध्ये ठरावीक धावा देण्याचे बुकींसोबत अगोदरच निश्चित केले होते, असा त्यांच्यावर आरोप होता. 
राजस्थान रॉयल्सचा सिद्धार्थ त्रिवेदी आणि हरमीत सिंग यांच्यावरही एक ते पाच वर्षे बंदी घालण्याची शिफारस सवानी समितीने केली आहे. बुकींनी आपल्याशी संपर्क साधला होता, हे न सांगितल्याबद्दल हरमीत सिंगवर बंदी घालण्याची शिफारस करण्यात आली आहे. त्रिवेदी याने नियमांचा भंग केल्याबद्दल त्यांच्यावर बंदी घालण्याची शिफारस करण्यात आली.
मी क्रिकेटपटू आहे, दहशतवादी नाही-चंडिला
मैं हूं डॉन!