X
X

युट्यूब व्हिडीओसाठी रस्त्यावर भूत बनून प्रँक करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांकडून अटक

READ IN APP

"एखाद्याचा अपघात झाला असता किंवा ह्रदयविकाराचा झटका आला असता तर जबाबदारी कोणाची असती?"

युट्यूब व्हिडीओसाठी रस्त्यावर भूत बनून प्रँक करत लोकांना घाबरवण्याचा प्रयत्न करणाऱ्या सात विद्यार्थ्यांना बंगळुरु पोलिसांनी अटक केली आहे. या विद्यार्थ्यांचं ‘Kooky Pedia’ नावाने युट्यूब चॅनेल असून त्यासाठी व्हिडीओ तयार करत होते. हे विद्यार्थी भुताच्या वेशात रस्त्यावर उतरुन पादचारी तसंच वाहन चालकांना घाबरवण्याचा प्रयत्न करत होते.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, “हे तरुण आरटी नगर परिसरात राहणारे आहेत. पण वेगवेगळ्या कॉलेजमध्ये शिकत आहेत. तरुण भुताच्या वेशात रस्त्यावर फिरत लोकांना घाबरवण्याचा प्रयत्न करत होते. त्यांच्यातील एक जण मृत असल्याचं नाटक करत होता, तर इतर जण त्याच्याभोती गर्दी करत लोकांना घाबरवत होते”.

स्थानिकांनी विद्यार्थ्यांविरोधात तक्रार केल्यानंतर पोलिसांनी रात्री २ वाजण्याच्या सुमारास अटकेची कारवाई केली. अटक केल्यानंतर विद्यार्थ्यांनी आपण प्रँक करत असल्याची कबुली दिली आहे. विद्यार्थ्यांनी माफी मागितल्यानंतर त्यांची सुटका करण्यात आली. या विद्यार्थ्यांची नावं शान मलिक, नवीद, साकीब, सय्यद नाबील, युसूफ अहमद, साजील मोहम्मद आणि मोहम्मद आयुब अशी आहेत.

“एखाद्याचा अपघात झाला असता किंवा ह्रदयविकाराचा झटका आला असता तर जबाबदारी कोणाची असती? अशा पद्धतीचे प्रँक करणं योग्य नाही,” असं पोलीस अधिकाऱ्याने म्हटलं आहे.

24
X