अध्यात्मिक गुरू भय्यू महाराज यांच्या आत्यमहत्येला आठवडा उलटून गेला मात्र त्यावरुन सुरू असलेल्या उलटसुलट चर्चा काही थांबताना दिसत नाहीयेत. या प्रकरणात आता राष्ट्रीय राजपूत करणी सेनेने खळबळजनक आरोप केले आहेत. भय्यू महाराजांवर सरकारचा दबाव होता, त्यामुळेच त्यांनी आत्महत्या केल्याचा गंभीर आरोप करणी सेनेने केला आहे.

या संपूर्ण प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्यात यावी,’ अशीही मागणी करणी सेनेने केली आहे. जर सीबीआय चौकशीचे आदेश दिले नाही तर करणी सेना आंदोलन करेन,’ असा इशाराही देण्यात आला. ‘भय्यू महाराजांकडे नर्मदा घोटाळ्याचे दस्ताऐवज होते. त्यामुळेच सरकारने त्यांच्यावर दबाव वाढवला होता, परिणामी भय्यूजींनी आत्महत्या केली. या संपूर्ण प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्यात यावी,’ अशी मागणी करणी सेनेने केली आहे. करणी सेनेचे अध्यक्ष सुखदेव सिंह गोगामेडी यांनी हा दावा केला.

‘सरकार इमानदार असेल तर त्यांनी या प्रकरणाची सीबीआय चौकशी करावी. मग सत्य बाहेर पडेल. जर सीबीआय चौकशीचे आदेश दिले नाही तर करणी सेना आंदोलन करेन,’ असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. भय्यूजींकडे नर्मदा घोटाळ्याचे कागदपत्रे होती. त्यांनी ही कागदपत्रे उघड करू नये म्हणून सरकारने त्यांच्यावर दबाव टाकला होता. तशी माहिती आम्हाला सोशल मीडिया आणि इतर स्त्रोतांकडून मिळत असल्याचं गोगामेडी म्हणाले.