28 February 2021

News Flash

बायको सतत स्मार्टफोनवर, नवऱ्याला हवा घटस्फोट, कोर्टाने दिला अजब निकाल

पत्नी दिवसभर मेसेज करणे आणि सेल्फी घेण्यातच मग्न असायची. कधी-कधी स्वयंपाकही बनवत नसत..

स्मार्टफोनमुळे आज जीवन सुकर झाले आहे. पण नातेसंबंधांमध्ये मात्र दुरावा निर्माण होताना दिसत आहे.

स्मार्टफोनमुळे आज जीवन सुकर झाले आहे. पण नातेसंबंधांमध्ये मात्र दुरावा निर्माण होताना दिसत आहे. व्हॉट्सअप, फेसबुक आणि अशाच काही सोशल मीडिया अॅपनी लोकांच्या आयुष्यावर नियंत्रण मिळवणे सुरू केले आहे. त्यामुळे नातेसंबंधांत कटुता निर्माण होत आहे. मित्रांमध्ये, आई-वडील-मुलांमध्ये, पती-पत्नींच्या संबंधांमध्ये याचा परिणाम पाहायला मिळते. आता मध्य प्रदेशमधील भोपाळमध्ये असाच काहीसा प्रकार समोर आला आहे.

भोपाळमधील कौटुंबिक न्यायालयात असेच एक प्रकरण पाहायला मिळाले. यात एका स्मार्टफोनमुळेच पती-पत्नीमध्ये घटस्फोटाची वेळ आली. याप्रकरणी सुनावणी करताना न्यायालयाने प्रथम त्यांना समुपदेशानाचा सल्ला दिला. नंतर त्यांनी आपला रोचक निर्णय दिला. जेव्हा घटस्फोटाबाबत न्यायालयात युक्तीवाद सुरू झाला. तेव्हा यांच्या भांडणाचे मुळ हे मोबाइल फोन असल्याचे समोर आले.

समुपदेशनादरम्यान पत्नी संगीताने म्हटले की, पती स्मार्टफोन वापरतो आणि आपल्याला त्याने एक साधा फोन दिला आहे. तो आपल्याला माहेरी फोनही करू देत नसल्याचे म्हटले. यावर पतीने न्यायालयाला सांगितले की, पत्नीने सासरी येताना स्मार्टफोन आणला होता. पण ती दिवसभर मोबाइलवर मेसेज करणे आणि सेल्फी घेण्यातच मग्न असायची. या स्मार्टफोनमुळे तिचे घरात लक्ष कमी झाले होते. अनेकवेळा ती स्वयंपाकही बनवत नव्हती. त्यामुळे तिचा स्मार्टफोन काढला आणि साधा फोन दिल्याचे त्याने सांगितले.

दोघांचेही म्हणणे ऐकून घेतल्यानंतर न्यायाधीश आश्चर्यचकित झाले. त्यावेळी निकाल देताना न्यायाधीशांनी म्हटले की, पत्नी जेव्हा घरातील सर्व काम संपवेल. तेव्हाच तिने मोबाइलला हात लावावा. त्याचबरोबर लग्नाच्या वाढदिवशी पतीने तिला स्मार्टफोन घेऊन द्यावा.
पत्नीने पतीसमोर ठेवलेल्या या ७ अटी पाहा..

१. वर्षातून एकदा पत्नीला शहराबाहेर फिरायला घेऊन जावे लागेल.

२. महिन्यातून एकदा रेस्तराँमध्ये पत्नीला जेवायला घेऊन जावे लागेल.

३. पंधरा दिवसाआड एक चित्रपट दाखवावा लागेल.

४. प्रत्येक महिन्याला पतीने पत्नीला खर्चासाठी २ हजार रूपये द्यावे लागतील. त्याचा हिशोबही विचारायचा नाही.

५. पत्नीच्या माहेरी होणाऱ्या कार्यक्रमांवर कोणतीही टिप्पणी करायची नाही.

६. पती कधीही पत्नीला माहेरी फोन करण्यापासून रोखू शकत नाही.

७. माहेरच्या लोकांविषयी पतीने कधीच अपशब्द वापरू नयेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 17, 2019 1:54 pm

Web Title: bhopal husband wife going to divorce over smartphone court deliver interesting verdict
Next Stories
1 कर्नाटकातील संकटाला काँग्रेसच जबाबदार! उपमुख्यमंत्र्यांचा घरचा आहेर
2 डान्सबार बंदी उठवली गेली हे दुर्दैवी- राष्ट्रवादी
3 ‘ताज महाल’ पडला मुलीच्या वडिलांच्या डोक्यात! मुलगा पोहोचला तुरुंगात
Just Now!
X