News Flash

बिहार – एमआयएम आमदाराचा शपथग्रहण करताना ‘हिंदुस्थान’ शब्द उच्चारण्यास नकार…

यंदाच्या बिहार विधानसभा निवडणुकीत एमआयएमचे पाच आमदार निवडून आले आहेत

बिहारमध्ये आजपासून नव्या विधानसभेचे सत्र सुरू झाले आहे. निवडणूक निकालपासून मुख्यमंत्री नितीश कुमार व राजद नेते तेजस्वी यादव यांच्यातील पुन्हा आरोप-प्रत्यारोप सुरू झाल्याचे दिसत आहे. सत्राच्या पहिल्यात दिवशी सर्व नव्या आमदारांनी शपथ घेतली. मात्र या दरम्यान, एमआयएम आमदार अख्तरूल इमान यांनी शपथग्रहण पत्रातील  हिंदुस्थान शब्दावर आक्षेप घेत, त्यागी भारत हा शब्द वापरला.

शपथपत्रात लिहिलेला ‘हिंदुस्थान’ शब्द उच्चारण्यास एमआयएमचे आमदार अख्तरुल इमान यांनी नकार दिला व त्या जागी ‘भारत’ या शब्दाचा वापर केला. अख्तरूल इमान यांचे नाव जेव्हा शपथ घेण्यासाठी पुकारण्यात आले तेव्हा, त्यांनी उभा राहून ‘हिंदुस्थान’ शब्दाबद्दल आक्षेप घेतला. त्यांना उर्दू भाषेत शपथ घ्यायची होती.उर्दूमध्ये भारतच्या जागी हिंदुस्थान शब्दाच्या वापरावर त्यांनी आक्षेप नोंदवत, हिंदुस्थान शब्दाच्या जागी भारत हा शब्द मी उच्चारतो आहे असे प्रोटेम स्पीकर मांझी यांना म्हटले.

अख्तरूल इमान यांनी म्हटले की, हिंदी भाषेत भारताच्या राज्यघटनेची शपथ घेतली जाते. मैथिलीमध्ये देखील हिंदुस्थानच्या जागी भारत शब्द वापरला जातो. मात्र उर्दूमध्ये शपथ घेण्यासाठी जे पत्र देण्यात आलेले आहे, त्यात भारताच्या जागी हिंदस्थान शब्दाचा वापर केला गेला आहे. तसेच, मी भारताच्या राज्यघटनेची शपथ घेऊ इच्छित आहेत असंही त्यांनी यावेळी त्यांनी म्हटले.

यंदाच्या बिहार विधानसभा निवडणुकीत एमआयएमचे पाच आमदार निवडून आले आहेत. पहिल्यांच एमआयएमने बिहारच्या विधानसभेत प्रवेश मिळवला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 23, 2020 2:53 pm

Web Title: bihar mim mla refuses to utter the word hindustan while taking oath msr 87
Next Stories
1 फ्रान्सचा पाकिस्तानला जोरदार झटका, मिराज फायटर विमाने, पाणबुडीच्या अपग्रेडेशनला दिला नकार
2 “परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात आहे”; महाराष्ट्रासह चार राज्यांकडून सर्वोच्च न्यायालयानं मागवला अहवाल
3 पाकिस्तानने जमिनीखालून बांधलेल्या २०० मीटर लांबीच्या बोगद्यातून जैशचे दहशतवादी भारतात घुसले पण…
Just Now!
X