11 December 2017

News Flash

मध्य प्रदेशात युवतीवर सामूहिक बलात्कार

मध्य प्रदेशच्या खारगोन जिल्ह्य़ातील पिपालझोपा वन क्षेत्राच्या परिसरात गुरुवारी एका १८ वर्षीय युवतीवर सहा

पीटीआय, बारवा (मध्य प्रदेश) | Updated: August 23, 2014 1:08 AM

मध्य प्रदेशच्या खारगोन जिल्ह्य़ातील पिपालझोपा वन क्षेत्राच्या परिसरात गुरुवारी एका १८ वर्षीय युवतीवर सहा जणांनी बलात्कार केल्याचे उघड झाले असून त्यामध्ये भाजपच्या एका नेत्याच्या मुलाचाही समावेश आहे, असे पोलिसांनी सांगितले.
या प्रकारानंतर भगवानपुरा पोलिसांनी सहाही आरोपींना अटक केली असल्याचे शुक्रवारी भिकनगाव उपविभागीय पोलीस अधिकारी करणसिंग रावत यांनी सांगितले.
भाजपचे माजी आमदार दलसिंग सोळंकी यांचा मुलगा नानगुदा ऊर्फ संतोष, इक्का, नानू, थवरिया, बिला आणि कलरिया अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे असून हे सर्व जण पिपालझोपा गावातील रहिवासी आहेत, असे रावत यांनी सांगितले.
या प्रकरणातील आरोपी इक्का याने आपल्याला विवाहाचे आमिष दाखवून जंगलात नेले. तेथे त्याने आणि त्याच्या पाच साथीदारांनी आपल्यावर बलात्कार केला, असे पीडित युवतीने आपल्या तक्रारीत म्हटले आहे.
या प्रकाराची वाच्यता केल्यास ठार मारण्याची धमकी या सहा जणांनी दिल्याचेही तक्रारीत म्हटले आहे. याबाबत अधिक तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

First Published on August 23, 2014 1:08 am

Web Title: bjp leader and five others arrested in mp for raping minor girl