02 March 2021

News Flash

‘हम दो हमारे पाच’चा संकल्प करा, मुलांना हत्यारं विकत घेऊन चालवायला शिकवा; भाजपा नेत्याचं आवाहन

प्रजासत्ताक दिनाच्या झेंडावंदनानंतर केलेल्या भाषणात केलं आवाहन

(फोटो : पीटीआय आणि युट्यूबवरुन स्क्रीनशॉर्ट)

उत्तर प्रदेशमधील मेरठ येथे मंगळवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमामध्ये झेंडावंदनानंतर भाजपाच्या नेत्याने जनतेला हम दो हमारे पाचचा संकल्प करण्याचं आवाहन केलं. भाजपाच्या व्यपार विभागाचे उत्तर प्रदेशमधील संयोजक असणाऱ्या विनीत अग्रवाल शारदा यांनी हे भाषण केलं. इतकचं नाही त्यांनी मुलांना हत्यारं विकत घेणं आणि ती चालवणंही शिकवलं पाहिजे असंही आपल्या भाषणात म्हटलं. जोपर्यंत कुटुंब नियोजनासंदर्भातील नियम बनवला जात नाही तोपर्यंत आपण हम दो हमारे पाचचा संकल्प केला पाहिजे. तसेच आपण जोपर्यंत कुटुंबनियोजनाचा ठोस नियम तयार होत नाही तोपर्यंत हम दो हमारे दोचा सिद्धांत संपवला पाहिजे असा युक्तीवादही शारदा यांनी केला. यावेळेस शारदा यांनी सरकारलाही आवाहन करताना, आमचे दोन त्यांचेही दोनचा नियम करावा किंवा हम दो हमारे पाचचा संकल्प करावा, असं म्हटलं आहे.

शारदा यांनी या पाच मुलांना काय काम देण्यात यावं यासंदर्भातही आपल्या भाषणामध्ये भाष्य केलं. या पाच मुलांपैकी सर्वाधिक शिकलेल्या मुलाला राजकारणात पाठवावं. एका मुलाला मान, मर्यादा आणि प्रतिष्ठेचे संरक्षण करण्यासाठी हत्यार खरेदी करणं आणि ते चालवणं शिकवावं. एका मुलाला भारतीय लष्करात पाठावे. एकाला व्यापारी करावं आणि एका मुलाला आयएएस किंवा पीसीएस बनवून भारतीयांच्या सेवेसाठी सक्षम करावं, असं शारदा यांनी म्हटलं आहे. आज लोकशाहीसाठी अत्यंत पवित्र दिवस असून आजच्याच दिवशी सरकारने सर्वांसाठी हम दो हमारे दोचा नियम बनवावा किंवा आजपासून आपण सर्वांनी हम दो हमारे पाचचा संकल्प अंमलात आणावा, असंही शारद आपल्या भाषणात म्हणाले.

फोटो सौजन्य : ट्विटरवरुन साभार

आपल्या भाषणामध्ये शारद यांनी रामायणाचाही संदर्भ दिला. महाराज दशरथ यांना चार पुत्र होते. दशरथ यांना चार पुत्र नसते तर आजही रावणाचे राज्य संपुष्टात आले नसते. त्यामुळेच देशात हम दो हमारे पाचची गरज आहे. असं झालं नाही तर भारतमाता पुन्हा एकदा रडेल. भारतमाता पुन्हा एकदा बेड्यांमध्ये अडकेल आणि पुन्हा एका पाकिस्तानची मागणी केली जाईल. त्यामुळेच भारत मातेला प्रमाण करताना मी हम दो हमारे पाचचं समर्थन करतो, असंही शारद यांनी आपल्या भाषणामध्ये म्हटलं आहे.

यापूर्वीही शारदा हे त्यांच्या कमल कमल कमलच्या वक्तव्यासाठी सोशल मिडियावर चर्चेत आले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 27, 2021 11:06 am

Web Title: bjp leader gave unique slogan on republic day said we two our five ask people to take resolve scsg 91
Next Stories
1 सत्तेत आल्यानंतर बायडेन प्रशासनाचा पाकिस्तानला पाहिला दणका, अमेरिकन नागरिकांना सांगितलं…
2 दीप सिद्धू हा भाजपाचा कार्यकर्ता, पंतप्रधानांसोबत त्याचा फोटो आहे – राकेश टिकैत
3 पत्नी सोडून गेल्याने १८ महिलांची हत्या; हैदराबादमध्ये सीरिअल किलरमुळे खळबळ
Just Now!
X