News Flash

छत्तीसगडमध्ये भाजपा नेत्यावर कु-हाडीने वार, पोलीस स्थानकापासून 200 मीटरवर हत्या

नक्षलवाद्यांचा हात असण्याचा संशय

छायाचित्र प्रातिनिधीक

छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये भाजपाच्या एका युवा नेत्याची धारधार शस्त्राने हत्या करण्यात आल्याचं वृत्त आहे. भोपालपट्टनम क्षेत्रात सोमवारी रात्री ही घटना घडली. पोलीस स्थानकापासून अवघ्या 200 मीटर अंतरावर ही हत्या करण्यात आल्याची माहिती आहे.

बस्तर क्षेत्राचे पोलीस महासंचालक विवेकानंद सिन्हा यांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजपा नेते जगदीश कुंडरू(40) हे संध्याकाळी 7 वाजेच्या सुमारास आपल्या घराबाहेर काही लोकांसोबत बोलत होते. त्याचवेळी काही अज्ञात व्यक्ती तेथे आले आणि कु-हाड व अन्य धारधार शस्त्राच्या सहाय्याने त्यांनी हल्ला चढवला. जखमी अवस्थेत त्यांना रूग्णालयात दाखल केलं पण तेथे त्यांना मृत घोषीत करण्यात आलं. जनसत्ताने याबाबत वृत्त दिलं आहे. या घटनेमागे नक्षलवाद्यांचा हात असण्याचा संशय व्यक्त होत आहे. पोलीस घटनेची चौकशी करत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 28, 2018 1:44 pm

Web Title: bjp leader murdered in chhattisgarh bijapur district
Next Stories
1 ‘प्लेबॉय’च्या अडीच कोटी फॉलोअर्सपैकी तुम्हीही एक आहात? मग हे वाचाच
2 APPLE चा सर्वात स्वस्त iPad लॉंच, 10 तासांचा तगडा बॅटरी बॅकअप
3 बॉल टॅम्परिंग म्हणजे नेमकं काय? का करतात बॉल टॅम्परिंग?
Just Now!
X