News Flash

न्यायालयात हजर राहणे टाळण्यासाठी भाजपा आमदाराने बनवला खोटा करोना अहवाल आणि नंतर..

न्यायालयाने चौकशी केल्यानंतर हा अहवाल खोटा असल्याचे समोर आले.

न्यायालयात गैरहजर राहण्यासाठी न्यायलयात खोटा करोना अहवाल सादर करणे एका आमदाराला चांगलेच महागात पडले आहे. उत्तर प्रदेशातील संत कबीर नगरच्या मेहदावल येथील आमदार राकेश सिंह बघेल यांनी न्यायालयात हजर राहणे टाळण्यासाठी वकिलामार्फत खोटा करोना अहवाल सादर केला होता. न्यायालयाने यासंदर्भात चौकशी केल्यानंतर हा अहवाल खोटा असल्याचे समोर आले. त्यानंतर न्यायालयाने बघेल यांच्या विरूद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.

संतकबीर नगर येथील न्यायालयाचे विशेष न्यायाधीश दीपकांत मणी यांनी आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत राकेश बघेल यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच खोटा करोना अहवाल दिल्याबद्दल डॉ. हर गोविंद सिंह यांच्याविरूद्धही न्यायालयाने गुन्हा दाखल करण्यास सांगितले आहे. न्यायालयात हजेरी लावण्यापासून वाचण्याचा प्रयत्न करणारे बघेल आता आणखी एका अडचणीत सापडले आहेत.

आमदार राकेश सिंह बघेल यांच्यावर २०१० साली सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. हा खटला गेल्या चार वर्षांपासून न्यायलयात सुरू आहे. माघील चार वर्षांत बघेल यांना आदेश देऊनही ते न्यायालयात हजर राहणे टाळत राहिले. त्यामुळे या खटल्याचे कामकाज अडकून पडले आहे. मात्र त्यांनी यावेळी न्यायालयात हजर राहणे टाळण्यासाठी नविन शक्कल लावली होती. न्यायालयाने खटल्यासाठी उपस्थित राहण्याची सूचना केल्यानंतर बघेल यांच्या वकिलांनी ९ ऑक्टोबर रोजी बघेल हे करोना पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल दिला. तसेच त्यांना होम आयसोलेशन मध्ये राहावे लागेल असे सांगण्यात आले. न्यायालयाने या अहवालाची चौकशी केल्यानंतर हा अहवाल खोटा असल्याचे उघड झाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 28, 2020 2:33 pm

Web Title: bjp mla fabricated corona report to avoid appearing in court abn 97
Next Stories
1 मालकाची विकृती, कॉम्प्रेसरने मजुराच्या गुदद्वारात भरली हवा
2 पोस्टाच्या तिकिटावर चक्क छोटा राजनचा फोटो; टपाल विभागाचा अनागोंदी कारभार
3 भारतातील प्रसिद्ध सेक्स एक्सपर्ट डॉ. महिंदर वत्स यांचे निधन
Just Now!
X