28 September 2020

News Flash

‘राहुल गांधींच्या पूर्वजांनाही संघाच्या शाखा बंद करणं जमलं नाही’

काँग्रेसने दिलेले हे आश्वासन हे 'मुंगेरीलाल के हसीन सपने' आहे. मध्य प्रदेशमध्ये सत्तेवर येण्याचे त्यांचे सर्व प्रयत्न अयशस्वी ठरणार आहेत.

मध्य प्रदेशमध्ये सरकारी कार्यालयात भरणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखा बंद करण्याचे आश्वासन काँग्रेसने निवडणूक जाहीरनाम्यात दिल्यानंतर आता राजकीय पडसाद उमटण्यास सुरुवात झाली आहे. भाजपाचे नेते अनुराग ठाकूर यांनी यावरुन नेहरु-गांधी कुटुंबीयांवर टीका केली आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या पूर्वजांना देशात मोठ्या पदावर असतानाही संघाच्या शाखांवर बंदी घालता आली नाही. मध्य प्रदेशमध्येही निवडणुकीतील त्यांचे हे आश्वासन पूर्ण करता येणार नाही. त्यामुळे काँग्रेसने संघाची चिंता करु नये, असा टोलाही त्यांनी लगावला.

मध्य प्रदेशातील एका निवडणूक कार्यालयाच्या शुभारंभप्रसंगी ते बोलत होते. हिमाचल प्रदेशमधील हमीरपूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार असलेले ठाकूर म्हणाले की, काँग्रेसने दिलेले हे आश्वासन हे ‘मुंगेरीलाल के हसीन सपने’ आहे. मध्य प्रदेशमध्ये सत्तेवर येण्याचे काँग्रेसचे सर्व प्रयत्न अयशस्वी ठरणार आहेत. देशातील अनेक राज्यात पराभव झाल्यानंतर काँग्रेसची दुकाने टप्प्याटप्याने बंद झाली आहेत. मध्य प्रदेशमध्ये २८ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीतही काँग्रेसच्या दुकानाला कुलूप लागणार आहे.

काँग्रेसने आपल्या निवडणूक जाहीरनाम्यात शासकीय आवारात संघाच्या शाखांवर बंदी घालणार असल्याचे म्हटले आहे. त्याचबरोबर सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना या शाखांमध्ये भाग घेण्यासाठी देण्यात आलेली सूट ही बंद करणार असल्याचे म्हटले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 13, 2018 8:04 am

Web Title: bjp mp anurag thakur challenged rahul gandhi to shut shakhas of rss
Next Stories
1 पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत आणखी घट; पहा…आजचे दर
2 सरकारी कर्मचाऱ्यांना कामगार दिनाच्या सुट्टीची गरज नाही : बिप्लब देब
3 इस्रायलच्या हवाई हल्ल्यात गाझातील टिव्ही चॅनेलची इमारत उध्वस्त
Just Now!
X