News Flash

गोमूत्र पिते त्यामुळेच मला करोना झालेला नाही -खासदार प्रज्ञा ठाकूर

गोमूत्र हे आपल्यासाठी जीवनदायी- प्रज्ञा ठाकूर

नेहमीच आपल्या विधानांवरून चर्चेत असणाऱ्या भाजपाच्या खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर या पुन्हा एकदा नव्या वक्तव्यामुळे चर्चेत आल्या आहेत. कोविडमुळे होणारा फुफ्फुसातील संसर्ग गोमूत्र प्यायल्याने बरा होऊ शकतो, असे भाजपच्या खासदार प्रज्ञा ठाकूर यांनी म्हटले आहे. गोमूत्र प्यायल्याने करोनासुद्धा होत नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यांनी स्वतःचे उदाहरण देत आपण रोज गोमूत्र पीत असल्याने करोना झाला नसल्याचे सांगितले. एका कार्यक्रमात त्या बोलत होत्या. त्यानंतर त्यांचा हा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी व्हिडिओमध्ये गोमूत्र प्यायल्याने करोना होत नसल्याचे म्हटले आहे. “देशी गायीचे गोमूत्र आपण प्यायलो तर फुफ्फुसाचा संसर्ग होत नाही. मला खूप त्रास होतो. पण मी रोज गोमूत्र पिते. यामुळेच करोनासाठी कोणतेही औषधे घ्यायची गरज लागत नाही. मला करोनाही झाला नाही”,  असे प्रज्ञा ठाकूर म्हणाल्या.

गोमूत्र हे आपल्यासाठी जीवनदायी असल्याने प्रज्ञा ठाकूर यांनी सांगितले.

प्रज्ञा ठाकूर रविवारी बैरागढ येथील एका कार्यक्रमात ऑक्सिजन कॉन्सेन्ट्रेटरच्या उद्घाटनासाठी गेल्या होत्या. त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. आपण आजारी असल्याने घरी राहूनच लोकांची मदत करत असल्याचे त्यांनी सांगितले.

दोन वर्षांपूर्वी गोमूत्रामुळे आपला कर्करोग बरा झाला असा दावा प्रज्ञा ठाकूर यांनी केला होता. प्रज्ञा ठाकूर यांनी डिसेंबर २०२० मध्ये करोनाची लक्षणे जाणवल्याने दिल्लीच्या एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

दरम्यान, इंडियन मेडिकल असोसिएशनने कोविडच्या उपचारांसाठी शेण किंवा गोमूत्राचा उपयोग होत असल्याचा कोणताही वैज्ञानिक पुरावा नसल्याने म्हटले होते. डॉक्टरांनी देखील अशा अपारंपरिक पर्यायी उपचार करण्यासंदर्भात इशारा दिला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 17, 2021 4:54 pm

Web Title: bjp mp pragya thakur says i drink cow urine so dont have covid abn 97
Next Stories
1 बंगाल पुन्हा पेटलं! तृणमूलच्या कार्यकर्त्यांची सीबीआय कार्यालयावर दगडफेक
2 RBI अ‍लर्ट: २३ मे रोजी ‘ही’ सुविधा काही तासांसाठी असणार बंद
3 कोविन अ‍ॅपवर आता स्पुटनिक व्ही लसीचा पर्याय
Just Now!
X