News Flash

‘निवडणुकीनंतर मोदींना पंतप्रधानपदाच्या उमेदवारीवरून डच्चू मिळण्याची शक्यता’

नरेंद्र मोदी कधीच देशाचे पंतप्रधान होणार नाहीत. त्यांच्या पक्षातील नेतेच त्यांना पंतप्रधान बनू देणार नाहीत.

| November 6, 2013 06:01 am

नरेंद्र मोदींच्या पंतप्रधानपदाच्या उमेदवारीवरून भाजपमध्ये मोठे कारस्थान रचण्यात आले असून, लोकसभा निवडणुकीच्या निकालांनंतर पक्षाचे बहुतांश खासदार मोदी यांना डच्चू देत पंतप्रधानपदासाठी लालकृष्ण अडवाणी यांना पाठिंबा देतील, अशी शक्यता उत्तर प्रदेशातील समाजवादी पक्षाच्या एका मंत्र्याने वर्तविली.
उत्तर प्रदेशातील खाणमंत्री गायत्री प्रसाद प्रजापती म्हणाले, नरेंद्र मोदी कधीच देशाचे पंतप्रधान होणार नाहीत. त्यांच्या पक्षातील नेतेच त्यांना पंतप्रधान बनू देणार नाहीत. ऐनवेळी ते मोदींना नक्कीच धोका देतील. अपप्रचाराच्या लाटांवर मोदी सध्या स्वार झाले आहेत. मात्र, उद्या पंतप्रधान बनण्याची संधी मिळाल्यास भाजपचे नेते मोदी यांना बाजूला ठेवून अडवाणी यांच्या नेतृत्त्वाची मागणी करतील. भाजपमध्ये रचण्यात आलेल्या मोठ्या कारस्थानाचा मोदींचे पंतप्रधानपद हा एक भाग आहे. याची मोदींना साधी कल्पनाही नाही. त्यांना ज्यावेळी परिस्थिती समजायला लागेल, त्यावेळी खूप उशीर झालेला असेल.
भाजपच्या नेत्या उमा भारती आणि विनय कटियार यांची पक्षात सध्या काय अवस्था झाली आहे, हे सगळेच जण पाहात आहेत, अशीही खोचक टिप्पणी प्रजापती यांनी केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 6, 2013 6:01 am

Web Title: bjp mps might ditch modi after lok sabha polls up minister
टॅग : Narendra Modi
Next Stories
1 सुमंगळ
2 ..तर पाकिस्तानला दहशतवादी राष्ट्र ठरवू!
3 बांगला देशात निमलष्करी दलाच्या १५२ सैनिकांना मृत्युदंड
Just Now!
X