11 August 2020

News Flash

भाजपसाठी संघटना फक्त निवडणुकीचे यंत्र नव्हे- मोदी

महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांचे मराठीतून कौतुक

टॉप ५० अधिकाऱ्यांकडून पंतप्रधान या बैठकीत माहिती घेतील. यापूर्वी पंतप्रधानांनी आर्थिक सल्लागार परिषद, मुख्य आणि प्रधान आर्थिक सल्लागार यांच्यासोबत बैठक केली आहे.

: भाजपची मजबूत पक्ष संघटना फक्त निवडणूक जिंकण्यासाठी बनवलेले यंत्र नाही. भाजपसाठी संघटना म्हणजे लोकसेवेचे माध्यम असते, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी पक्ष कार्यकर्त्यांसमोर केले.

करोनाच्या संकटात गेले तीन महिने राज्या-राज्यांमधील भाजपच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या जनसेवेचा आढावा मोदी यांच्या उपस्थितीत घेण्यात आला. महाराष्ट्र, बिहार, कर्नाटक, दिल्ली, आसाम, उत्तर प्रदेश आणि राजस्थानच्या प्रदेशाध्यक्षांनी करोना काळातील कामांचा अहवाल मांडला. चित्रवाणीसंवादाद्वारे झालेल्या या कार्यक्रमात पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आदी सहभागी झाले होते.

महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांचे मराठीतून कौतुक

महाराष्ट्रात भाजपने केलेल्या कामांची सविस्तर माहिती प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत  पाटील यांनी या आढावा कार्यक्रमात दिली. त्यांना मोदींनी मराठीतून प्रतिसाद दिला. टाळेबंदीच्या काळात स्थलांतरित मजुरांना महाराष्ट्रात भाजप कार्यकर्त्यांनी त्यांची खूप मदत केली. त्याबद्दल त्यांचे आभार, या शब्दांत मोदींनी कौतुक केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 5, 2020 12:22 am

Web Title: bjp organization is not just an election machine modi abn 97
Next Stories
1 मुंबईसह सहा शहरांतील विमानांना कोलकात्यात बंदी
2 जोश इज हाय! घातक अपाचे, मिग २९ प्रहार करण्यासाठी सज्ज
3 Fact Check: मोदींनी हॉस्पिटलला भेट दिली की नाही? लष्कराचा खुलासा
Just Now!
X