कुंभस्नानासाठी जगभरातील लाखो भक्त आणि साधू उत्तरप्रदेशमधील प्रयागराज येथे हजेरी लावतात. सध्या सुरू असलेल्या कुंभमेळ्यामध्ये अनेक राजकीय नेते हजेरी लावत आहेत. मोहन भागवत, नितीन गडकरी आणि स्मृती इराणी यांच्यासह अनेक नेत्यांनी आतापर्यंत कुंभमेळ्यात हजेरी लावली आहे. आज बुधवारी भाजपा अध्यक्ष अमित शहा यांनी उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासमवेत कुंभमेळ्यात हजेरी लावली. यावेळी अमित शहा यांनी पवित्र त्रिवेणी संगमवर शाही स्नान केले. तसेच यावेळी अमित शहा आणि योगी आदित्यनाथ यांनी त्रिवेणी संगमावर आरती केली.

शाही स्नानानंतर अमित शहा यांनी सर्व धार्मिक स्थळांना भेटी दिल्या असून. येथील साधू-संतांशी चर्चा केली आहे. १९ फेब्रुवारीला माघ पौर्णिमेच्या सहावे आणि शेवटचे स्नान महाशिवरात्रीला म्हणजेच ४ मार्चला शेवटचे शाही स्नान होणार आहे.